‘सरकार गँग’चे दणाणले धाबे

By admin | Published: March 23, 2017 12:06 AM2017-03-23T00:06:22+5:302017-03-23T00:06:22+5:30

गुंडगिरीत वर्चस्व निर्माण करणारी 'सरकार गँग' पोलिसांच्या हिसक्यामुळे नेस्तनाबूत झाली आहे.

The Scarf of Government Gang | ‘सरकार गँग’चे दणाणले धाबे

‘सरकार गँग’चे दणाणले धाबे

Next

गाड्यांवरील नाव काढले: नागरिकांना घेता येणार मोकळा श्वास
अमरावती : गुंडगिरीत वर्चस्व निर्माण करणारी 'सरकार गँग' पोलिसांच्या हिसक्यामुळे नेस्तनाबूत झाली आहे. पोलिसांनी कठोर कारवाईचा फास आवळल्यानंतर सरकार गँगच्या म्होरक्यासह अन्य सदस्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी त्यांच्या वाहनांवर अंकित केलेला 'सरकार' हा शब्द सुद्धा काढून टाकल्याचे निदर्शनास आले आहे.
रविनगरात दहशत पसरविणाऱ्या सरकार गँगने रंगपंचमीला पोलीस कर्मचारी राजू घुलेवर तलवारीने हल्ला केल्यानंतर राजापेठ पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हे नोंदविले. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून दोन आरोपी अद्याप पसार आहेत. पोलीस चौकशीत सरकार गँगमध्ये तब्बल अठरा सदस्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी १३ जणांची मंगळवारी पोलीस आयुक्तांसमोर पेशी झाली. त्यांनी गँगमधील तरूणांना समज दिला असून पुढे असे प्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सरकार गँगचे सदस्य हे महाविद्यालयीन विद्यार्थी असून महाविद्यालयात टवाळखोरपणा करून इतर विद्यार्थ्यांवर दादागिरी करीत होते. सरकार गँगचे मुख्य सूत्रधार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेठीस धरून विद्यार्थ्यांमध्ये दबदबा निर्माण करीत होते. स्नेहसंमेलन असो किंवा अन्य कोणतेही कार्यक्रम असो, अशाप्रसंगी हस्तक्षेप करून महाविद्यालयात वर्चस्व निर्माण करीत होते. विद्यार्थिंनींसोबत असभ्य वागणूक, छेडखानीचे प्रकारही होत होते. यागँगच्या सदस्यांजवळ देशी कट्टे असल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. लहान-सहान वादांमध्ये विद्यार्थ्यांना चाकूचा धाक दाखवून सरकार गँगचे दबदबा निर्माण करीत होते. रविनगरात झालेल्या तांडवानंतर सरकार गँगचा पदार्फाश झाला असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचा फास आवळला आहे. सरकार गँगमधील सदस्यांना पोलिसी खाक्या दाखविताच आता या गँगचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. त्यामुळे नागरिकांना आता सुटकेचा श्वास घेता येणार आहे.
(प्रतिनिधी)

शिवाजी मार्केटजवळ हुल्लडबाजी
सरकार गँगचे बहुतांश सदस्य रविनगर चौकातील शिवाजी मार्केट परिसरात ठिय्या मांडून हुल्लडबाजी करतात. महागड्या दुचाकी घेऊन मार्केटच्या आवारात टवाळखोरी करण्यात ते माहिर आहेत. दुचाकीवर बसून त्यामार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना व महिलांची छेड काढण्याचे काम सरकार गँगचे सदस्य करीत होते. रविनगरजवळील एका नामांकित महाविद्यालयात तरुण-तरुणींची नेहमीच वर्दळ सुरु असते, अशावेळी सरकार गँगचे सदस्य मुलींवर लक्ष ठेऊन त्यांची छेड सुद्धा काढत असल्याचे प्रकार उघड झाले आहे. अनेकदा यामार्केट परिसरात झालेल्या वादात शस्त्रहल्ला झाल्याचीही एक घटना काही वर्षांपूर्वी घडली आहे.

दीड महिन्यांत रोज लावावी लागणार हजेरी
सरकार गँगच्या सर्व सदस्यांची मंगळवारी सीपींसमोर पेशी करण्यात आली असून त्यांना दररोज पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश पोलीस आयुक्तांने दिले. दीड महिने यासर्व सदस्यांना ठाण्यात हजर रहावे लागणार आहे.

Web Title: The Scarf of Government Gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.