बुरखाधारी चोरट्या महिला गजाआड
By admin | Published: March 29, 2015 12:22 AM2015-03-29T00:22:21+5:302015-03-29T00:22:21+5:30
सक्करसाथ परिसरातील सराफा बाजार १५ दिवसांपूर्वी चार बुरखाधारी महिलांनी एका ज्वेलरी प्रतिष्ठानमधून १४ लाखांच्या सोनसाखळ्या लंपास केल्या.
अमरावती : सक्करसाथ परिसरातील सराफा बाजार १५ दिवसांपूर्वी चार बुरखाधारी महिलांनी एका ज्वेलरी प्रतिष्ठानमधून १४ लाखांच्या सोनसाखळ्या लंपास केल्या. या प्रकरणात आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने व शास्त्रोक्त पध्दतीने तपास करुन चारही बुरखाधारी महिलांना शनिवारी मालेगावातून अटक केलीे.
१४ मार्च रोजी कोठारी यांच्या ज्वेलरी प्रतिष्ठानात चार बुरखाधारी महिला सोन्याचे दागिने खरेदीकरिता गेल्या होत्या. मात्र त्यांनी दागिने खरेदी केले नव्हते. सायंकाळी ज्वेलर्सचे संचालक कोठारी यांनी दागिन्याची मोजणी केल्यावर १४ लाखांच्या सोनसाखळ्या लंपास झाल्याचे निदर्शनास आले होते.