मेळघाट सायबर सेलमुळे खवले मांजराचे तस्कर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:14 AM2021-02-16T04:14:55+5:302021-02-16T04:14:55+5:30

पाच आरोपींना पुण्यात अटक, काळ्या जादूसह औषधांमध्ये होतो वापर अनिल कडू परतवाडा : मेळघाट सायबर सेलच्या माहितीवरून जिवंत खवले ...

Scavenger cat smuggler arrested due to Melghat cyber cell | मेळघाट सायबर सेलमुळे खवले मांजराचे तस्कर गजाआड

मेळघाट सायबर सेलमुळे खवले मांजराचे तस्कर गजाआड

googlenewsNext

पाच आरोपींना पुण्यात अटक, काळ्या जादूसह औषधांमध्ये होतो वापर

अनिल कडू

परतवाडा : मेळघाट सायबर सेलच्या माहितीवरून जिवंत खवले मांजरांची तस्करी करणाऱ्या पाच आरोपींना पकडण्यात पुणे वनविभागाला यश आले आहे.

पुणे वनविभागांतर्गत खवले मांजराची काही लोक तस्करी करीत आहेत. ते जिवंत खवले मांजर पकडून त्याची विक्री करीत असल्याची माहिती पुणे वनविभागाला मिळाली. याबाबत त्यांनी मेळघाट सायबर सेलची मदत घेतली. काही मोबाईल नंबरचे लोकेशनसह सीडीआर मेळघाट सायबर सेलने त्यांना पुरविले. एवढेच नव्हे तर डीकॉई ऑपरेशनमध्ये बनावट खरेदीदार म्हणूनही भूमिका पार पाडली. यात एकूण पाच आरोपींसह एक जिवंत खवले मांजर, चारचाकी व एक दुचाकी वाहन पुणे वनविभागाने ताब्यात घेतले आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कार्यरत मेळघाट सायबर सेल राज्यातील एकमेव सायबर सेल आहे. अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प एम.एस. रेड्डी यांच्या नियंत्रणांतर्गत मेळघाट सायबर सेल कार्यरत आहे. या सायबर सेलची मदत राज्यासह राज्याबाहेरील अनेक घटनांमध्ये घेण्यात आली आहे. या सायबर सेलकडून पुरविल्या गेलेली माहिती वन व वन्यजीव गुन्ह्यात महत्वपूर्ण ठरली आहे. यात अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात वन्यजीव विभागासह वनविभागाला यश आले आहे.

खवले मांजर हा दुर्मिळ प्राणी आहे. वन्यजिवांच्या शेड्यूल वनमध्ये त्याची गणना आहे. वाघाएवढेच महत्त्व त्याला आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर हा प्राणी आहे. या खवले मांजरांची मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय तस्करी केली जाते. चीन आणि व्हिएतनाममध्ये खूप मागणी आहे. मांस खाण्याकरिता व खवले औषधांमध्ये वापरली जातात. अंधश्रद्धेतून काळ्या जादूसाठीही कातडी वापरली जाते.

बॉक्स

उकळत्या पाण्यात टाकताता

खवले मांजर धोका ओळखून स्वत:च्या शरिराचा चेंडू करून घेतो तेव्हा त्याला पुन्हा मूळ स्वरूपात माणसालाही आणता येत नाही. हा प्राणी कुर्हाडीलाही दाद देत नाही. त्यामुळे त्याला पकडल्यानंतर उकळत्या पाण्यात टाकून त्याला मारले जाते.

बॉक्स

खवले मांजर शेतकऱ्यांसह गावकऱ्यांचा मित्र आहे. एका दिवसात वाळवीसारखे वीसेक हजार कीटक खाऊन तो नैसर्गिकरीत्या पेस्ट कंट्रोलचे काम करतो.

Web Title: Scavenger cat smuggler arrested due to Melghat cyber cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.