शिष्यवृत्तीचे अर्ज आता महाडीबीटी प्रणालीवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:11 AM2021-01-02T04:11:40+5:302021-01-02T04:11:40+5:30
अमरावती : कोरोना संसर्गामुळे तूर्त महाविद्यालये कधी सुरू होणार, हे निश्चित नाही. तथापि, सामाजिक न्याय विभाग व इतर मागास ...
अमरावती : कोरोना संसर्गामुळे तूर्त महाविद्यालये कधी सुरू होणार, हे निश्चित नाही. तथापि, सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत दिली जाणारी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, गुणवत्ता शिष्यवृत्ती अथवा वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता, आदी शैक्षणिक लाभासाठी आता महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करावे लागणार आहे.
शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ या वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर नवीन अथवा नूतनीकरणाचे अर्ज भरण्याची
सुविधा माहिती तंत्रज्ञान विभागाने ३ डिसेंबर २०२० पासून संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.
चालू शैक्षणिक वर्षात देखील डीबीटी पोर्टलद्धारे पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता,
शिक्षण फी, परीक्षा फी व इतर अनुज्ञेय फी त्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे. यात भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण परीक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यवसायी पाठ्यक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता यांचा समावेश आहे.
----------
शैक्षणिक संस्था, प्राचार्यांनी मागास विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, निर्वाहभत्ता, शिक्षण फी, परीक्षा फी व इतर अनुज्ञेय फी महाडीबीटी प्रणालीवरच ऑनलाईन सादर करावी. संकेतस्थळ उपलब्ध झाले आहे. विद्यार्थी वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी लागेल.
- विजय साळवे, प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण