शाळेची घंटा वाजली; विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:14 AM2021-09-11T04:14:47+5:302021-09-11T04:14:47+5:30

पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आणि विद्यार्थी अजूनही शाळेपासून दूर जितेंद्र दखने अमरावती: जिल्ह्यातील ज्या गावात कोरोना रुग्ण महिनाभरापासून नाही अशा ...

The school bell rang; Who will take care of the health of the students? | शाळेची घंटा वाजली; विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणार कोण?

शाळेची घंटा वाजली; विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणार कोण?

Next

पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आणि विद्यार्थी अजूनही शाळेपासून दूर

जितेंद्र दखने

अमरावती: जिल्ह्यातील ज्या गावात कोरोना रुग्ण महिनाभरापासून नाही अशा ठिकाणी शाळा सुरू करण्याचा आदेश शासनाने दिला असून, त्यानुसार काही शाळाही सुरू झाल्या आहेत; परंतु मागील वर्षाप्रमाणे यावर्षी शाळा निर्जंतुकीकरण व करुणा प्रतिबंधात्मक उपायांविषयी स्पष्ट आदेश लेखी स्वरूपात काढले गेलेले नाही. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील १८२ माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये एकूण ४० हजारावर पटसंख्या आहे; मात्र यापैकी उपस्थिती मात्र केवळ १० हजार आत आहे. यावरून अजूनही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास पालक उत्सुक नसल्याचे दिसून येते. त्याचा मुलांच्या आरोग्याविषयी असुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी शासन कोणतेही प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

पहिली-४०५६२

दुसरी-३८३६५

तिसरी -३९८०७

चौथी -४३३६४

पाचवी-४४६०४

सहावी-४३२३४

सातवी -४४४९५

आठवी -४३६९६

नववी-४३७२६

दहावी-४४१०२

बॉक्स

सॅनिटायझेशन करा, पण पैसे देणार कोण?

निर्जंतुकीकरण प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना शासनाकडून होत आहेत; मात्र निधी नसल्याने निर्जंतुकीरणास पैसा कोण देणार, असा प्रश्न मुख्याध्यापक व शिक्षकांना पडला आहे.

बॉक्स

स्थानिक स्तरावर नियोजन करण्याच्या सूचना

कोराेना संसर्गामुळे बंद असलेल्या जिल्ह्यातील शाळा हळूहळू सुरू होत आहेत. त्यासाठी शाळातली मागील वर्षाप्रमाणे स्थानिक ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने स्थानिक स्तरावर नियोजन केले जात आहे; परंतु काही ठिकाणी शाळा सुरू होऊनही रुग्ण आढळल्याने शाळा बदल करावे लागत असून, यासंदर्भातील निर्णय घेणे आवश्यक असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

बॉक्स

तोंडी आदेशामुळे मुख्याध्यापकांसमोर पेच

हरदाविषयी शासनाने लिखित आणि सातवा सूचना दिलेली नाही. त्यामुळे शाळांची निर्जंतुकीकरणासह अन्य खर्च करावा, असा पेच मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील १८२ शाळा सुरू

जिल्ह्यातील महिनाभराच्या कालावधीत कोरोना संसर्ग नसलेल्या वेगवेगळ्या गावातील सुमारे १८२ माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. सुरू झालेल्या शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत विद्यार्थ्यांची शाळेमध्ये उपस्थिती कमी आहे.

Web Title: The school bell rang; Who will take care of the health of the students?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.