आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रिया सुरू
By Admin | Published: April 12, 2016 12:10 AM2016-04-12T00:10:11+5:302016-04-12T00:10:11+5:30
आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित घटकातील पाल्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो.
अखेर मुहूर्त गवसला : २१ एप्रिलपर्यंत मुदत
अमरावती : आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित घटकातील पाल्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ११ एप्रिलपासून जिल्ह्यात शाळा नोंदणी प्रक्रिया नवीन वेळापत्रकानुसार सुरू करण्यात आली आहे. २१ एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यात पहिल्यांदाच आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सोमवार ११ एप्रिल पासून शाळांची नोंदणी सुरू केली आहे. प्रवेशासाठी यंदा अंदाजे ४ हजार जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील दोनशे शाळा या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. पूर्व प्राथमिक आणि पहिलीच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जाईल. यात सहभागी होण्यासाठी शाळांना आॅनलाईन नोंदणी २१ एप्रिलपर्यंत पूर्ण केली जाईल. ही प्रक्रिया आटोपताच नोंदणीकृत शाळांत आरटीई कायद्यांतर्गत निकषानुसार प्रवेश दिले जाईल. याबाबत शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे प्रक्रिया सुरू झाली आहे.
अगोदर शाळांची नोंदणी, त्यानंतर प्रवेश
अमरावती : ही प्रक्रिया नॅशनल इन्फॉमेंटिक्स सेंटरच्यावतीने शिक्षण विभागाद्वारे राबविली जात आहे. ही नोंदणी सोमवारपासून सुरू झाली आहे. त्यानंतर २२ एप्रिलपासून विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज स्वीकारले जातील. विमुक्त आणि भटक्या जमाती, द्रारिद्ररेषेखालील कुटंूब इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेले कुटंूब, अनुुसुचित जाती, अनुुसूचित जमाती अपंग बालक आदींना प्रवेश मिळणार आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळांची आॅनलाईन नोंदणी सुरू केली आहे. या मध्ये २१ एप्रिल पर्यंत शाळांनी नोंदणी करावी. ज्या शाळा नोंदणी करणार नाहीत. अशा शाळांवर नियामनुसार कारवाई केली जाईल
-एस.एम पानझाडे,
प्राथमिक शिक्षणाधिकारी