स्कूल ऑफ स्कॉलर्सचे बारावीच्या परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:13 AM2021-07-31T04:13:31+5:302021-07-31T04:13:31+5:30

अमरावती : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस.ई) चा इयत्ता बारावीचा निकाल ३० जुलैला जाहीर झाला. यात स्व. श्रीमती राधिकाबाई ...

School of Scholars success in Class XII examination | स्कूल ऑफ स्कॉलर्सचे बारावीच्या परीक्षेत यश

स्कूल ऑफ स्कॉलर्सचे बारावीच्या परीक्षेत यश

Next

अमरावती : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस.ई) चा इयत्ता बारावीचा निकाल ३० जुलैला जाहीर झाला. यात स्व. श्रीमती राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्था (नागपूर) द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

वैष्णवी अग्रवाल या विद्यार्थिनीने ९४.४ टक्के गुण मिळविले. आयुष चापकेने ९२.६, सौम्या मोरे हिने ९१ टक्के गुण मिळविले. एकूण २९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ९१ ते ९३ टक्के गुण घेणारे तीन, ८० ते ९० टक्के गुण घेणारे आठ, ७० ते ८० टक्के गुण घेणारे १२, ६० ते ७० टक्के गुण घेणारे चार आणि ६० टक्क्यांपेक्षा कमी गुण घेणारा एक विद्यार्थी आहे. प्राचार्य सुरेश लकडे, उपप्राचार्य समीधा नाहर, प्रशासकीय अधिकारी निलय वासाडे, शिक्षक वृंद व पालकांनी निकालाबाबत समाधान व्यक्त केले.

Web Title: School of Scholars success in Class XII examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.