शाळेला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांनी रोखली बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:12 PM2017-11-16T23:12:33+5:302017-11-16T23:12:58+5:30
प्रवाशांची दाटी असल्याने वाढोणा येथे थांबा न घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या बसपुढे विद्यार्थ्यांनी लोटांगण घालून ती थांबवली. आम्हाला शाळेत जायला उशीर होत असल्याने .....
लोकमत न्यूज नेटवर्क
कुऱ्हा : प्रवाशांची दाटी असल्याने वाढोणा येथे थांबा न घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या बसपुढे विद्यार्थ्यांनी लोटांगण घालून ती थांबवली. आम्हाला शाळेत जायला उशीर होत असल्याने याच बसमधून प्रवास करू द्यावा, नसल्यास दुसºया बसची व्यवस्था करावी. मात्र, तोपर्यंत आम्ही ही बस पुढे जाऊ देणार नाही, असे या बालप्रवाशांनी ठणकावून सांगितले. मुलांच्या या पवित्र्यामुळे चांदूरहून दुसरी बस सोडावी लागली. दरम्यान, घटनास्थळावर आलेल्या कुºह्याच्या ठाणेदारांना बालकांनी या रोजच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली.
तिवस्याहून चांदूर रेल्वेकरिता कुºहामार्गे पहिली बस पंक्चर झाल्याने त्यानंतरच्या तिवसा-चांदूर रेल्वे बसवर बरीच गर्दी होती. सकाळी १०.३० वाजता कुºहा येथून सुमारे ७० प्रवासी चढले. वाढोणा थांब्यावर आमला, चांदूर रेल्वे येथे शिक्षणासाठी जाणारे २५ ते ३० विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत होते. जागा नसल्याचे पाहून चालक-वाहकाने बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलांनी त्वरेने बसपुढे येत ती अडवून धरली व रस्त्यावर झोपले. जोपर्यंत आम्हाला घेत नाही किंवा दुसरी बस येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. बसमधील प्रवाशांनीही त्यांचे समर्थन केले. ही बाब चालक-वाहकांनी चांदूर आगाराला कळविली. त्यांनी कुऱ्हा पोलिसांना माहिती दिल्यामुळे पोलीस पथक उपनिरीक्षक प्रणीत पाटील यांच्या नेतृत्वात पोहोचले. पंचायत समिती सदस्य मंगेश भगोलेदेखील यावेळी पोहोचले. त्यांच्यासह विद्यार्थ्यांची रास्त मागणी प्रवाशांनी उचलून धरल्यामुळे चांदूर आगाराहून दुसरी पाठवून हा गुंता सोडविण्यात आला.
कुºहा पोलिसांनी वाढोणा बस थांबा गाठला आणि विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या. दुसरी बसच्या प्रतीक्षेत मुलांना शाळेत उशीर झाला असता. त्यातच काही मुलांचे पेपर होते. यामुळे पीएसआय प्रणीत पाटील यांनी पोलीस जीपने मुलांना आमला येथे पोहचविले आणि त्यांची गैरसोय टाळली. याबद्दल विद्यार्थ्यांनी पोलिसांचे आभार मानले.
कुºह्याहून बसमध्ये प्रवासी, विद्यार्थ्यांची दाटी झाली, की पुढच्या स्टॉपवर बस थांबवली जात नाही. त्यामुळे दररोज विद्यार्थ्यांची गर्र्दी पुढच्या बसची वाट पाहत राहते. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून, चांदूर आगाराने शाळेच्या वेळेला विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडावी.
- अर्चना तिरमारे, शिक्षिका
नेहमीच मुले बसच्या प्रतीक्षेत आढळून येतात. या मार्गावर धावणाºया चांदूर आगाराच्या बस एक तर वाईट अवस्थेला पोहोचल्या आहेत. दुसरीकडे बसफेºयांसाठी वेळेचे नियोजन पाळले जात नाही. याबाबत महामंडळाच्या वरिष्ठांकडे आगार व्यवस्थापकाची तक्रार करणार आहे.
- मंगेश भगोले, पंचायत समिती सदस्य