शालेय विद्यार्थ्याची पुस्तकाविना भरताहेत शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:17 AM2021-08-28T04:17:26+5:302021-08-28T04:17:26+5:30
अमरावती: पुस्तकाविना शाळा मध्ये शिक्षणाचे ज्ञानदानाचे कार्य जिल्ह्यात सुरू आहे. पालक तसेच शिक्षकांकडून पाठ्यपुस्तके पुरविण्यासाठी होणारी ओरड होत ...
अमरावती: पुस्तकाविना शाळा मध्ये शिक्षणाचे ज्ञानदानाचे कार्य जिल्ह्यात सुरू आहे. पालक तसेच शिक्षकांकडून पाठ्यपुस्तके पुरविण्यासाठी होणारी ओरड होत आहे.मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही परिणामी पुस्तकाविनाच विद्यार्थ्याची शाळा भरून वेळ निभावून नेली जात आहे.
जिल्ह्यात शाळा सुरू होऊन जवळपास अडीच महिन्याचा कालावधी झाला आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्याना अद्याप मोफत पाठ्यपुस्तके मिळाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येताच. शासनाच्या निर्देशानुसार २८ जून पासून शाळा सुरू करण्यात आल्यात. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्याना दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र यंदा ती पुरविण्यात आली नाही. त्यामुळे जुनी पुस्तके गोळा करून शिक्षकांच्या माध्यमातून ती दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात आली. नंतर पुन्हा शासनाने आदेशात बदल करण्यात आला. यानंतर सेतू अभ्यासक्रमाचा उपक्रम सुरू करण्यात आला. मात्र त्यालाही स्थगिती मिळाली.या दरम्यान शाळांकडून पुस्तकाची मागणी नोंदवून घेण्यात आली. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे संपूर्ण माहिती सादर करण्यात आली. मात्र अडीच महिने होऊनही अनेक विद्यार्थ्यापर्यत पुस्तके पोहोचली नसल्याचे वास्तव आहे.
बॉक्स
शिकवायचे कसे
पाठ्यपुस्तके अद्याप प्राप्त झाले नाही. विद्यार्थी नियमित शाळेत हजर राहत आहे. पर्यायी व्यवस्था करून आणि मुलांना शिकवावे लागत आहे. एका पुस्तकात दोन ते तीन विद्यार्थी शिकवणी सुरू असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
कोट
मागणीनुसार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बालभारती कडून काही पुस्तकांचा पुरवठा झाला नाही हे खरे आहे. मात्र अपवादात्मक स्थितीत सर्व शाळांना पुस्तके मिळालेली आहे.
एजाज खान
शिक्षणाधिकारी प्राथमिक