शाळा बंद, एसटीचे लाखोंचे उत्पन्न बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:14 AM2021-07-07T04:14:46+5:302021-07-07T04:14:46+5:30
अमरावती : अनलॉक होऊन आता एक महिना होत आला आहे. दररोज एसटीचे उत्पन्नात वाढ होत आहे. आंतरजिल्हा,आंतरराज्य अशा अनेक ...
अमरावती : अनलॉक होऊन आता एक महिना होत आला आहे. दररोज एसटीचे उत्पन्नात वाढ होत आहे. आंतरजिल्हा,आंतरराज्य अशा अनेक बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसादही लाभत आहे. मात्र अजूनही शाळा-महाविद्यालय ऑनलाईन सुरू असल्याने हजारो पासधारक विद्यार्थी अपडाऊन करीत नसून गेल्या दीड वषार्पासून शाळा बंद असल्याने एसटी महामहामंडळाचे महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल थांबली आहे.
प्रशासनाकडून अनलॉकची घोषणा झाल्यानंतर हळूहळू व्यवसाय, कारखानदारी, कार्यालय पूर्वपदावर येत आहेत. त्यानुसार शंभर टक्के क्षमतेनुसार एसटी बसही धावायला लागली आहे .बस गाड्यांमध्ये प्रवासी स्वत: सॅनिटायझर, माक्सचा उपयोग करत आहेत. मात्र शाळा अजूनही ऑनलाईन सुरू असल्याने मध्यवर्ती बसस्थानकासह अन्य ठिकाणच्या आगारातून पासधारक विद्यार्थी नसल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळ लाखो रुपयांचे नुकसान याचा फटका सहन करावा लागत आहे. गत दीड वर्षात एसटीची यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
बॉक्स
पास खिडकीवर शुकशुकाट
दरवर्षी शाळा सुरू होताना मध्यवर्ती बस स्थानक परिसरात असलेल्या विद्यार्थ्यांची पास काढण्यासाठी मोठी लगबग दिसून येत होती. मात्र, बस स्थानकावरील पास खिडकीवरील विद्यार्थ्यांची सध्या शाळा-महाविद्यालये बंद असल्याने होणारी धावपळही दिसत नाहीत.
बॉक्स
अनेक गावखेड्यांतून धावतात बस
राज्य परिवहन महामंडळाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना शिक्षणासाठी गाव पासून ते शहरापर्यंत ने-आण करण्यासाठी अनेक मार्गांवर शाळा-महाविद्यालयात मुला-मुलींसाठी एसटी बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, कोरोनामात्र शाळकरीे विद्यार्थ्यांसाठी धावणारी ‘लाल परी’ सध्या धावत नाही.