शाळांना प्रतिपूर्ती शुल्काचा निधी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:01 PM2018-03-23T22:01:07+5:302018-03-23T22:01:07+5:30

आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या जिल्हाभरातील संस्थाचालकांना अद्यापही मागील काही वर्षांपासून शासनाकडून देण्यात येणारा शाळांना प्रतिपूर्ती शुल्काचा निधी मिळालेला नाही.

Schools get refinance funding | शाळांना प्रतिपूर्ती शुल्काचा निधी मिळेना

शाळांना प्रतिपूर्ती शुल्काचा निधी मिळेना

Next
ठळक मुद्देसंस्थाचालकांचे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमरावती : आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या जिल्हाभरातील संस्थाचालकांना अद्यापही मागील काही वर्षांपासून शासनाकडून देण्यात येणारा शाळांना प्रतिपूर्ती शुल्काचा निधी मिळालेला नाही. त्यामुळे शुक्रवारी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने अपर जिल्हाधिकारी के.पी. परदेशी यांना निवेदन देऊन निधीची मागणी केली.
आरटीई कायद्यांतर्गत वंचित व दुर्बल घटकातील २५ टक्के मोफत प्रवेश दिलेल्या शाळांना सन २०१४-१५ पासूनचे प्रवेश प्रतिपूर्ती शुल्काची रक्कम थकीत आहे. त्यामुळे शाळांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. थकीत रक्कम मिळण्याबाबत शासनाला विनंती करण्यात आली. मात्र, निधी वितरणाबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना अद्याप निर्देश नाहीत. त्वरित कार्यवाही न केल्यास आरटीई प्रवेशप्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनातून महाराष्ट्र इंग्लिश ट्रस्टीज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल आसलकर, अभिजित देशमुख, प्रमोद यादव, संदीप गावंडे, प्रशांत लांडे आदींनी दिला आहे.

Web Title: Schools get refinance funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.