क्वांरटाईनसाठी पुन्हा शाळा, वसतिगृहे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:14 AM2021-03-08T04:14:03+5:302021-03-08T04:14:03+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विविध उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने क्वांरटाईन सेंटर साकारण्यासाठी पुन्हा शाळा, वसतिगृहे ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विविध उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने क्वांरटाईन सेंटर साकारण्यासाठी पुन्हा शाळा, वसतिगृहे ताब्यात घेतले आहे. यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सात शाळा, १६ वसतिगृहांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ५ मार्च रोजी संचारबंदीत शिथिलतेचे नवे आदेश जारी केले आहे. यात सकाळी ९ ते ४ वाजता दरम्यान सर्व दुकाने, आस्थापना सुरू करण्याचे आदेश आहे. मात्र, या आदेशात शाळा, महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे पुढे किती दिवस शाळा, महाविद्यालयांना कुलूप राहील, हे तूर्त सांगता येणार नाही. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार, भरती करण्यासाठी क्वारंटाईन सेंटर साकारले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या सुसज्ज वसतिगृहे, शाळांना प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, त्या भागातील शाळा, वसतिगृहे क्वारंटाईन केंद्रांसाठी ताब्यात दिल्याची माहिती विभागीय समाजकल्याण अधिकारी विजय साळवे यांनी दिली. कोरोनाच्या रुग्ण संख्येनुसार परिस्थिती बघता इतर विभागाच्या शाळा, वसतिगृहे ताब्यात घेण्यात येतील, अशी माहिती आहे.