शास्त्रज्ञांनी कुंड गावात शोधले कोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:22 AM2017-12-07T00:22:02+5:302017-12-07T00:22:16+5:30

श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय व इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (कोलकाता) द्वारा पुरस्कृत आंतरराष्ट्रीय परिसंवादासाठी आलेल्या देश-विदेशातील सुमारे ८० शास्त्रज्ञांनी मेळघाटच्या सफारीत कुंड गावात कोळ्यांच्या विविध प्रजातींची ओळख करून घेतली.

Scientists discovered the Spider in the village Kund | शास्त्रज्ञांनी कुंड गावात शोधले कोळी

शास्त्रज्ञांनी कुंड गावात शोधले कोळी

Next
ठळक मुद्देमेळघाटात परिसंवाद : ‘स्पायडर’वर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा

आॅनलाईन लोकमत
अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय व इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (कोलकाता) द्वारा पुरस्कृत आंतरराष्ट्रीय परिसंवादासाठी आलेल्या देश-विदेशातील सुमारे ८० शास्त्रज्ञांनी मेळघाटच्या सफारीत कुंड गावात कोळ्यांच्या विविध प्रजातींची ओळख करून घेतली.
बोरी (हरिसाल) येथे मुठवा समुदाय संशोधन केंद्रात आयोजित ‘सायन्स अँड इको सिस्टिम्स इन इंडिया’ या तीनदिवसीय परिसंवादात शास्त्रज्ञांनी आपले शोधप्रबंधही सादर केले. सातपुडा पर्वतरांगेतील जैवविविधता, २१ व्या शतकातील जैवतंत्रज्ञान कौशल्य, वन्यजीव व्यवस्थापनाचे आजच्या काळातील महत्त्व, वन्यजीव व्यवस्थापनात लोकसहभाग आदी विषयांवर अनेक तज्ज्ञ व वन्यजीव अभ्यासकांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
कोळी (स्पायडर) अभ्यासक अतुल बोडखे यांनी विविध प्रजातींचा अभ्यास सादर केला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, उपाध्यक्ष गजानन पुंडकर, कौषाध्यक्ष दिलीप इंगोले, प्राचार्य रामेश्वर भिसे आदींनी परिसंवादाला भेटी दिल्या. विस्थापित कुंड गावात निर्माण झालेल्या जंगलात शास्त्रज्ञांनी वन्यजिवांचा अभ्यास केला. यामध्ये शास्त्रज्ञ वीरेंद्र प्रसाद, सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्यूलर बॉयलॉजी (हैद्राबाद) चे शास्त्रज्ञ सुनीलकुमार वर्मा, शास्त्रज्ञ साजिया काफीन यांच्यासह महेश चिखले, गजानन संतापे, सुभाष कांबळे यांचीही उपस्थिती होती. महाराष्ट्र वाइल्ड लाइफ वॉर्डन ए.के. मिश्रा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारतीय वन्यजीव संशोधन संस्थान (डेहराडून), सातपुडा फाऊंडेशन, राजर्षी शाहू महाविद्यालय (चांदूर रेल्वे), महात्मा फुले महाविद्यालय (वरूड) व मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय (अमरावती) यांनी आयोजनात योगदान दिले.

Web Title: Scientists discovered the Spider in the village Kund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.