सिंचन प्रकल्प तहानले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:20 AM2019-07-13T01:20:37+5:302019-07-13T01:21:15+5:30

तालुक्यातील सर्व नऊ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहे. जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने सर्वत्र चिंतेचे सावट आहे. दुबार पेरणीचे संकट घोंगावते आहे. १ जून ते १२ जुलै या कालावधीत २८८.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ १०३.३ मिमी अर्थात ३५.८ टक्के अशी निचांकी पावसाची नोंद झाली आहे.

Screw the irrigation project | सिंचन प्रकल्प तहानले

सिंचन प्रकल्प तहानले

googlenewsNext
ठळक मुद्देपाणीटंचाईचे संकेत : सिंचनात अडसर, आभाळाकडे डोळे

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : तालुक्यातील सर्व नऊ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहे. जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने सर्वत्र चिंतेचे सावट आहे. दुबार पेरणीचे संकट घोंगावते आहे. १ जून ते १२ जुलै या कालावधीत २८८.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ १०३.३ मिमी अर्थात ३५.८ टक्के अशी निचांकी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
तालुक्यात शेकदरी प्रकल्प पूर्ण जलसंचय क्षमता ५१४.६५ दलघमी तर ओलित क्षमता १ हजार ३४० हेक्टर, पुसली प्रकल्पाची जलसंचय क्षमता १००.६० दलघमी, ओलित क्षमता ३०९ हेक्टर, वाई प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ४६१.७७ दलघमी असून ओलित क्षमता ३७० हेक्टरची आहे. सातनूर प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ५००.७५ दलघमी, तर ओलित क्षमता २९९ हेक्टर, पंढरी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४४८.३० दलघमी, तर ओलित क्षमता १५३ हेक्टर, जामगाव, प्रकल्पाची पूर्ण जलसंचय क्षमता ४८०.५० दलघमी असून, ओलित क्षमता १२१ हेक्टर, नागठाणा प्रकल्पाची पूर्ण जलसंचय क्षमता ४८१.६० दलघमी असून, ओलित क्षमता २१२ हेक्टर, जमालपूर प्रकल्पाची पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० दलघमी असून, ओलित क्षमता १२२ हेक्टर , बेलसावंगी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० दलघमी असून, ओलीत क्षमता १२१ हेक्टर, लोणी धवलगिरी प्रकल्पाची ओलीत क्षमता ६३६ हेक्टरची आहे. तसेच वघाळ बंधाऱ्याची ओलीत क्षमता ४९६ हेक्टर आहे. यावर्षी जलसंचय नसल्याने तहाणलेलेच आहे. यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याचासुद्धा प्र्रश्न उदभवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पिकेसुद्धा सुकायला लागली आहे. यावर्षी केवळ १०४.९९ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Screw the irrigation project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.