शिल्पकारांची जन्मभूमी उपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:52 PM2018-12-01T22:52:53+5:302018-12-01T22:53:14+5:30
शिल्पकारांची जन्मभूमी अशी ओळख मिरविणाऱ्या टिमटाळ्याची शासनाने उपेक्षा केली आहे. खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दत्तक घेतले असले तरी या गावात सुविधांची वानवा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव बारी : शिल्पकारांची जन्मभूमी अशी ओळख मिरविणाऱ्या टिमटाळ्याची शासनाने उपेक्षा केली आहे. खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दत्तक घेतले असले तरी या गावात सुविधांची वानवा आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हे गाव अडीच वर्षांपासून दत्तक घेतले होते. त्यासोबतच जनुना, जावरा, खिरसाना, निरसाना, अडगाव ही गावेसुद्धा दत्तक घेतली होती. तरीही या गावांचा विकास अद्यापही झाला नसल्याचे दिसून येत आहे. १९ नोव्हेंबर १९८४ रोजी महाराष्टÑ राज्यातील अमरावती जिल्ह्याच्या टिमटाळा या गावात एकनाथ रानडे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामकृष्ण रानडे हे टिमटाळा स्टेशनवर स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत होते. पुढे त्यांची बदली झाल्याने ते कुटुंबासह नागपूरला स्थायिक झाले. कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिल्प स्मारक त्यांनी उभारले. २ सप्टेंबर १९७० साली तत्कालीन राष्टÑपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण झाले. या त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे पंतप्रधानांनी टिमटाळा या गावाची दत्तक ग्राम म्हणून निवड केली होती. तरी हे गाव अद्यापही विकास कामापासून कोसो दूर आहे. अडीच वर्षे उलटूनही घेतलेल्या दत्तक गावांचा विकास खोळंबला आहे. टिमटाळा गावात उद्योगधंदे, महिलांना उद्योग, वाचनालय, घरकुल सुविधा, शौचालय, संपूर्ण डांबरी रस्ते, सौंदर्यीकरण, एकनाथ रानडे यांचे स्मारक हे केंद्र शासनाच्यावतीने दत्तक ग्राम विकास योजनेच्यावतीने दोन वर्षात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही ही गावे विकास कामांपासून वंचित आहे. एकनाथ रानडे राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असल्याने पंतप्रधानांनी टिमटाळा गाव दत्तक घेण्यासाठी पीयूष गोयल यांना पाठविले होते. गावाच्या विकासासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंद अडसूळ, आ. वीरेंद्र जगताप यांच्याकडे दत्तक गावाच्या विकासाचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गावकºयांचे गावाचा विकास केव्हा होणार, याकडे लक्ष लागले आहे.
टिमटाळा, खिरसाना, निरसाना ही गावे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दत्तक घेतली असली तरी केंद्र शासनाने काम केलेच नाही. या गावांमधील घरकुल, शौचालयांची बांधकामे ग्रामपंचायतनेच केली.
- लता भेंडे
सरपंच, खिरसाना-निरसाना.