५४ दुकाने सील; दोघांविरुद्ध गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2017 12:08 AM2017-05-18T00:08:11+5:302017-05-18T00:08:11+5:30

स्थानिक जयस्तंभ चौक स्थित प्रियदर्शनी इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील भाडे थकित असणारी ५४ दुकाने सील करण्यात आली.

Seal 54 Shops; Crime against both | ५४ दुकाने सील; दोघांविरुद्ध गुन्हे

५४ दुकाने सील; दोघांविरुद्ध गुन्हे

Next

भाडे थकित : महापालिका बाजार परवाना विभागाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक जयस्तंभ चौक स्थित प्रियदर्शनी इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील भाडे थकित असणारी ५४ दुकाने सील करण्यात आली. महापालिकेच्या बाजार परवाना विभागाने बुधवारी ही कारवाई केली. दरम्यान कारवाईत अडसर निर्माण करणाऱ्या चंदू लुल्ला व राजू नेभवाणी यांच्याविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांमध्ये फौजदारी तक्रार करण्यात आली. निरीक्षक केशव ठाकरे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंविचे कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हे नोंदविले.
आयुक्त हेमंत पवार यांनी कर थकित संकुलधारक, मालमत्ता धारकांकडून वसुली मोहिम आरंभली आहे. त्याअनुषंगाने बुधवारी महापालिका प्रशासनाच्या मालकीचे असलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी व्यापारी संकुलाची झाडाझडती घेण्यात आली. यात तब्बल ५४ दुकानदारांकडे लक्षावधीचा कर थकित असल्याचे वास्तव समोर आले. त्यापैकी काही संकुलधारकांनी परस्पर गाळे विकल्याचेही प्रकरण निदर्शनास आले आहे. पहिल्या टप्प्यात कर थकित असलेल्या गाळेधारकांचे दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. थकित कर वसूल होईस्तोवर दुकाने सील राहील, असे संकेत प्रशासनाने दिले आहे. ही कारवाई उापयुक्त नरेंद्र वानखडे यांच्या मार्गदर्शनात बाजार परवाना विभागाच्या अधीक्षक निवेदिता घार्गे, निरिक्षक केशव ठाकरे, आनंद काशीकर, अभियंता संकेत वाघ, स्वप्नील महल्ले, अमर सिरवानी आदींनी केली आहे. ही कारवाई थांबविण्यात यावी, यासाठी प्रियदर्शनी संकुलातील व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आयुक्त हेमंत पवार यांची सायंकाळच्या सुमारास भेट घेतली. मात्र पवार यांनी थकबाकी भरल्याशिवाय दुकानांचे सील उघडण्यात येणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. उशीरा सायंकाळपर्यंत या व्यावसायिकांनी प्रशासनावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Seal 54 Shops; Crime against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.