अचलपूर तालुक्यातील सहा गावे सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:17 AM2021-04-30T04:17:17+5:302021-04-30T04:17:17+5:30
परतवाडा : कोरोनाचा प्रादुर्भाव व रुग्णांची वाढती संख्या बघता अचलपूर तालुक्यातील देवमाळी, कांडली, गौरखेडा, सावळी दातुरा ,नारायणपूर व आरेगाव ...
परतवाडा : कोरोनाचा प्रादुर्भाव व रुग्णांची वाढती संख्या बघता अचलपूर तालुक्यातील देवमाळी, कांडली, गौरखेडा, सावळी दातुरा ,नारायणपूर व आरेगाव ही सहा गावे सील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनाला दिले आहेत. २९ एप्रिलला रात्री बारा वाजता पासून ही गावे सील केल्या जाणार आहेत. ३० एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत ही गावे सील राहणार आहेत.
गाव सील केल्याचे फोटो गाव पातळीवरील यंत्रणेला त्याच दिवशी प्रशासनाकडे पाठवावे लागणार आहेत.
या गावातील नागरिक बाहेर जाणार नाहीत किंवा बाहेरील व्यक्ती गावात येणार नाही याकरिता संबंधित गावाचे रस्ते बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात गावातील सर्व दुकाने बंद ठेवल्या जाणार आहेत. जिवनाआवश्यक वस्तूंचा गावातच पुरवठा करणाऱ्या व्यक्तींची नावे तहसील कार्यालयाने मागवली आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये अचलपूर तहसीलदार मदन जाधव आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जयंत बाबरे यांनी आपल्या स्वाक्षरीनिशी २९ एप्रिलला तसे स्वतंत्र आदेश काढले आहेत. या आदेशान्वये गाव पातळीवर संबंधित गावांच्या ग्रामपंचायत चे सचिव , तलाठी, पोलीस पाटील, आरोग्य दक्षता समिती तथा आपत्ती व्यवस्थापन समिती
ला ही जबाबदारी पार पाडावयाची आहे. संबंधित गावांच्या नोडल अधिकाऱ्यांनाही तसे कळविण्यात आले आहे.
या सहा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. या गावात आणखी रुग्ण वाढण्याची व त्यांच्याद्वारे इतर गावात कोरोना आजाराचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नसल्याचे या आदेशात म्हटले आहे.