राजापेठ येथील महापालिका संकुलातील आठ दुकाने सील
By admin | Published: November 26, 2014 10:59 PM2014-11-26T22:59:46+5:302014-11-26T22:59:46+5:30
राजापेठ येथील महापालिकेच्या संकुलातील १६ दुकानदारांना तात्पुरते स्वरुपात पर्यायी व्यवस्था म्हणून सदर दुकाने देण्यात आली होती. त्यापैकी आठ दुकानदारांनी ही दुकाने स्वत: जवळच
अमरावती : राजापेठ येथील महापालिकेच्या संकुलातील १६ दुकानदारांना तात्पुरते स्वरुपात पर्यायी व्यवस्था म्हणून सदर दुकाने देण्यात आली होती. त्यापैकी आठ दुकानदारांनी ही दुकाने स्वत: जवळच ठेवण्याचा डाव रचला होता. परिणामी बुधवारी ही दुकाने पोलीस बंदोबस्तात सील करुन ताब्यात घेण्यात आली आहेत.
राजापेठ व्यापारी संकुलामध्ये व्दारकानाथ मार्केटचे एकूण १६ दुकानदारांना तात्पुरते स्वरुपामध्ये पर्यायी व्यवस्था म्हणून दुकान देण्यात आलेली होती. त्यापैकी ८ दुकानदारांनी दुकाने मनपास हस्तांतरित करुन नवीन जे.अँड डी मॉलमध्ये दुकाने सुरु केलेली आहेत. उर्वरीत ८ दुकानधारकांनी दुकाने मनपाचे ताब्यात दिलेले नव्हते. त्यामुळे सदर दुकाने आज सील करण्यात आलेली आहेत. निलकमल मतानी, अमरलाल तिरथदास कुकरेजा, नंदलाल बसंतलाल अरोरा, चंदनदास गणेशदास तरडेजा, ईश्वरदास मेघराज वर्मा, नंदलाल सुगनचंद तरडेजा, दयानंद रमेशचंद्र पोपली, गुरुमुखदास मतानी यांचे दुकान सील करुन महानगरपालिकेने ताब्यात घेतली आहेत.
सदर कारवाई आयुक्त अरुण डोंगरे यांचे आदेशान्वये गंगाप्रसाद जयस्वाल, अधीक्षक बाजार व परवाना विभाग व यांचे मार्गदर्शनामध्ये मानविराज दंदे (निरीक्षक) उमेश सवई (निरीक्षक), केशव ठाकरे, अनिद काशीकर, स्वप्नील महल्ले, अमर सिरवानी, हरीराम शेलुकर व अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांनी कारवाई पार पाडली. महापालिकेच्या कारवाईमुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.