डांबरीकरणानंतर ४८ तासांत सिलिंग अनिवार्य, लेखापरीक्षणातील आक्षेपानंतरचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 05:25 PM2018-02-12T17:25:13+5:302018-02-12T17:25:33+5:30
डांबरीकरणाचे काम झाल्यानंतर कामांचे सिलिंग ४८ तासांच्या आत करण्याचे कडक निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत.
अमरावती - डांबरीकरणाचे काम झाल्यानंतर कामांचे सिलिंग ४८ तासांच्या आत करण्याचे कडक निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत. बहुतांश कामांमध्ये सिलिंग वेअरिंग काटे टाकण्यास विलंब होत असल्याने रस्त्यांच्या कामात परिपूर्णता येत नसल्याचा आक्षेप महालेखापालांनी घेतल्याने या नव्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांच्या दुरूस्तीच्या व मूळ स्वरूपाच्या कामांमध्ये डांबरीकरण करण्याच्या कामांविषयी या सूचना आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित राज्यातील प्रमुख राज्य मार्ग, राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांचे बांधकाम करणे व दुरूस्तीचे कामे येतात. त्या अनुषंगाने महालेखापालांनी केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड योजना व अन्य कामांचे विशेष लेखापरीक्षण केले. रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामामध्ये बिटुमिन्स मॅकॅडम, एमपीएम अथवा डेम्स बिटूमिन्स मॅकॅडम इत्यादी प्रकारच्या तरतुदींचे काम पूर्ण झाल्यानंतर भारतीय रस्ते महासभेच्या निर्देशाप्रमाणे ४८ तासांच्या आत या डांबरीकरण कामांसाठी सिलिंग वेअरिंग कोट उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. या सूचनांचे पालन राज्यातील काही कामांच्या संदर्भात करण्यात आले नसल्याचे निरीक्षण लेखापरीक्षण पथकाने नमूद केला आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने ८ फेब्रुवारी २०१८ रोजी शासननिर्णय काढून सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार डांबरीकरणाचे काम झाल्यानंतर कामांचे सिलिंग ४८ तासांच्या आत उपलब्ध करून द्यावे, यासंदर्भात सर्व क्षेत्रिय अधिकाºयांनी विशेष दक्षता घ्यावी, यात कसूर करणाºया क्षेत्रिय अधिकाºयांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्याची तंबी शासनाने दिली आहे.
सिलिंग म्हणजे काय?
वाहने ज्या सरफेसवर चालतात, ते स्मुथ सरफेस म्हणजे सिलिंग. डांबरीकरणाचा खालचा लेअर टाकल्यानंतर त्यावर ९ मिनिटे २० मि.मी. पर्यंत दुसरा स्मुथ लेअर टाकण्यात येतो. तो स्मृत लेअर ४८ तासांच्या आत टाकण्याचे निर्बंध घालण्यात आले आहे. त्यासंदर्भात ‘प्रोटेक्शन आॅफलेअर’ची सर्व क्षेत्रिय अधिकाºयांनी दक्षता घ्यावयाची आहे.