रेड्डी यांच्या कार्यालयातील कागदपत्रांचे सर्चिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 05:00 AM2021-04-26T05:00:00+5:302021-04-26T05:00:57+5:30

मेळघाटातील हरिसाल येथे मुंबई येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनात २१ ते २४ एप्रिल असे चार दिवस या चमूने दीपाली प्रकरणाशी धागेदोरे असलेली कागदपत्रे, कर्मचारी-अधिकाऱ्यांचे बयाण नोंदविले. निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी दीपाली चव्हाण यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याबाबतच्या आवक-जावक विभागातील नोंदी पथकाने तपासल्यात.

Searching for documents in Reddy's office | रेड्डी यांच्या कार्यालयातील कागदपत्रांचे सर्चिंग

रेड्डी यांच्या कार्यालयातील कागदपत्रांचे सर्चिंग

googlenewsNext
ठळक मुद्देआयपीएस चौकशी पथक दाखल, सुसाईड नोटवर फोकस

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डींच्या भूमिकेची चौकशीसाठी अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली गठित चार सदस्यीय चौकशी पथक रविवारी दुपारी अमरावतीत दाखल झाले. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील काही कागदपत्रांची पथकाने तपासणी केली तसेच तेथील शासकीय विश्रामगृहात तिघांचे बयाण नोंदविण्यात आले.
मेळघाटातील हरिसाल येथे मुंबई येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनात २१ ते २४ एप्रिल असे चार दिवस या चमूने दीपाली प्रकरणाशी धागेदोरे असलेली कागदपत्रे, कर्मचारी-अधिकाऱ्यांचे बयाण नोंदविले. निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी दीपाली चव्हाण यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याबाबतच्या आवक-जावक विभागातील नोंदी पथकाने तपासल्यात. रविवार सुटीचा दिवस असतानासुद्धा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे कार्यालय या चौकशी पथकासाठी उघडण्यात आले होते. यावेळी कार्यालय अधीक्षक व्ही.पी. चव्हाण, आस्थापना विभागाचे विक्रम राय, आवक-जावक  कर्मचारी संजय दुर्गे आदींनी या पथकाला कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सहकार्य केले. आयपीएस प्रज्ञा सरवदे यांचे चौकशी पथक हे दीपाली यांनी चार पानी सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या बाबीवर चौकशीच्या अनुषंगाने फोकस करीत आहेत. हे पथक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर कायदेशीर कारवाईसंदर्भात चौकशी करीत आहे. या पथकाने सदस्यांनी एकाच वेळी बयाण नाेंदविले व कागदपत्रांची पडताळणी केली. रेड्डी यांच्या शासकीय बंगल्याची झाडाझ़डती सोमवारी घेण्यात येईल. 
 

दीपाली यांच्या पतीचे नोंदविले बयाण
आयपीएस प्रज्ञा सरवदे यांचे चौकशी पथकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी रविवारी सायंकाळी ४.३० वाजता दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांचे बयाण नोंदविले. सुसाईड नोटमध्ये असलेल्या मुद्द्यांवर काही प्रश्नांना अनुसरून राजेश माेहितेंकडून माहिती घेतली. वनपाल-वनरक्षक कर्मचारी संघटनेचे इंद्रजित बारस्कर, प्रदीप बाळापुरे यांचेही बयाण नोंदविले. 

आयपीएस प्रज्ञा सरवदे आज अमरावतीत
वनमंत्रालयाने दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी प्राथमिक चौकशी करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक व सह व्यवस्थाकीय संचालक प्रज्ञा सरवदे यांच्यावर धुरा सोपविली आहे. आयपीएस प्रज्ञा सरवदे यांचे चार सदस्यीय चौकशी पथक दाखल झाले. सरवदे या २६ एप्रिल रोजी उशिरा सायंकाळी अमरावती येथे पोहोचणार असून, मंगळवारी सकाळी ८ नंतर त्या हरिसालकडे रवाना होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title: Searching for documents in Reddy's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.