एकाच मुख्यध्यापकावर लाच मागितल्याचा दुसरा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 07:40 PM2019-09-08T19:40:26+5:302019-09-08T19:42:36+5:30
१३ हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी मुख्याध्यापक, सचिव व एक परिचर यांच्यावर एक दिवस आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अमरावती: फुबगावमधील येथील सुरेशबाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश इरभानजी कथे यांना लाच मागितल्या प्रकरणी, तर लाच घेण्यास प्रोत्साहन देणाऱ्या राजू उमाटेविरुद्ध सहा महिन्यांपूर्वी लाचलुचपत विभागाच्या तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा रविवारी दाखल करण्यात आला.
१३ हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी मुख्याध्यापकसह सचिव व एक परिचर यांच्यावर एक दिवस आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ९ एप्रिल २०१९ रोजी त्याच शाळेतील एका शिक्षीकेने लाचलुचपत विभागाला मुख्याध्यापक व शिक्षकाने साठ हजाराची लाच मागितल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांची चोकशी करण्यात आली होती. परंतु चतुराजी बहुउद्देशीय संस्था सचिवाची पडताळणी होत नव्हती. लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने ६० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आले. तसेच या सदर गुन्ह्याचा तपास अधिकारी संतोष शेगावकर, पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे, कैलास सानप, शेखर दहिकर, प्रमोद धानोरकर, आशिष जांभाळे, नितीन कळमकर हे करीत आहे.
तसेच या गुन्ह्यात प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आलेली नाही. त्याच्या अटकेसाठी लाचलुचपत विभागाचे एक पथक त्या गावी रवाना झाले आहे.