दुसºयाही दिवशी एसटीची चाके थांबलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:14 PM2017-10-18T23:14:39+5:302017-10-18T23:15:49+5:30
राज्याची जीवनवाहिनी असलेली एसटी बसची चाके दुसºया दिवशी बुधवारीदेखील ठप्प होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्याची जीवनवाहिनी असलेली एसटी बसची चाके दुसºया दिवशी बुधवारीदेखील ठप्प होती. संपाचा लाभ घेत खासगी वाहतूकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची अक्षरश: लूट चालविली आहे, तर एसटी कर्मचारी मागण्यांवर ठाम आहेत.
जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या ४४७ एसटी बसची चाके दिवाळीच्या दोन दिवस आधी थांबली. जिल्ह्यातील चालक, वाहक, यांत्रिकी व इतर असे एकूण २३०० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये दररोज जाणाºया ११२० फेºया रद्द झाल्या. दररोज ५० ते ६० हजार प्रवासी एसटीने प्रवास करतात. यातून एसटीला ३० ते ३५ लाख रूपयांचे रोज उत्पन्न मिळते. दोन दिवसांपासून कर्मचाºयांच्या संपामुळे हे उत्पन्न बुडाले आहे. दिवाळीसाठी आपल्या गावी जाणाºया प्रवाशांची बुधवारीही कसरत झाली. संपाचा फायदा खासगी काळीपिवळी वाहने, इतर बसेस व प्रवासी वाहनांनी घेतला असून, त्यांनी १० ते १५ टक्के अतिरिक्त भाडेवाढ करून प्रवाशांची लूट केली. नोकरदार वर्गाचीही चांगलीच गोची झाली आहे.
२२ संघटनांचा संपात सहभाग
राज्यभर १ लाख १७ हजार कर्मचाºयांनी संपात सहभाग घेतला असून, २२ विविध एसटी कर्मचाºयांच्या संघटना सहभागी झाल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, इंटक (कॉग्रेस), कनिष्ठ वेतनश्रेणी संघटना, विदर्भ एसटी कामगार संघटना, संघर्ष, सोशल मीडिया अशा अनेक संघटना यामध्ये सहभागी झाल्या असल्या तरी आगर व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक, पर्यवेक्षक व इतर कुठलेही मोठे अधिकारी संपात सहभागी झालेले नाही.
खासगी वाहनांवर प्रवाशांची धाव
एसटी बसेसची चाके दिवाळीच्या पूर्वसंध्येला अचानक थांबल्यामुळे नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी कुठलाच पर्याय उरला नव्हता. त्यामुळे त्यांना काळीपिवळी वाहने, खासगी बस, आॅटोरिक्षा तसेच प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी भरलेल्या इतर अनेक वाहनांनी प्रवास करावा लागला. नागरिकांनी बुधवारीदेखील जीव धोक्यात टाकून प्रवास केला. या दरम्यान प्रवाशांकडून जादा पैसेही उकळण्यात आले.
मध्यवर्ती आगारात पदाधिकाºयांची निदर्शने
कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय शासन घेणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांनी व त्यांच्या संघटनांनी घेतली. मध्यवर्ती आगारात कर्मचारी विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी एकत्रित येऊन निदर्शने केली. येथे विविध पदाधिकाºयांनी आपली मतेसुद्धा व्यक्त केली. एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष मोहित देशमुख, सचिव शरद मालवीय, महाराष्ट्र मोटर कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय धांडे, सचिव गणेश तायडे, एसटी कामगार संघटनेचे आगार अध्यक्ष अनिल पांडे, सचिव ए.एस. खान यांच्यासह अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. चालक, वाहक व कर्मचाºयांनीही या ठिकाणी ठिय्या मांडला होता.
मला दर्यापूरला जायचे आहे; पण बस नाही. त्यामुळे खासगी वाहन शोधावे लागेल. आमची चांगलीच गैरसोय झाली आहे. शासनाने कर्मचाºयालाही न्याय दिला पाहिजे, असे माझे मत आहे.
- दादाराव दवंडे, प्रवासी
कर्मचाºयांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत संप सुरूच राहील. बाहेरून बस घेऊन आलेल्या कर्मचाºयांना आगाराच्या निवास्थानात न ठेवण्याचे आदेश आहेत. - मोहित देशमुख, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना