६९ हजार नागरिकांना ६ ते ८ आठवड्यांनी दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:14 AM2021-03-25T04:14:11+5:302021-03-25T04:14:11+5:30
अमरावती : कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस ४ आठवड्यानंतर घ्यावा लागतो. आता कोविशिल्ड लसकरिता ही मुदत ६ ...
अमरावती : कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस ४ आठवड्यानंतर घ्यावा लागतो. आता कोविशिल्ड लसकरिता ही मुदत ६ ते ८ आठवडे झालेली आहे. याविषयी केंद्रीय आरोग्य सचिवांचे पत्र आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात ८१,६९७ नागरिकांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला यापैकी ६९,०५३ नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांना २८ दिवसांऐवजी ६ ते ८ आठवड्यांच्या आत दुसरा डोस घ्यावा लागेल.
पुणेस्थित सीरम इन्स्टिट्युडच्या कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनंतर घेता येत होता. याविषयीचा आढावा नॅशनल टेक्निकल ॲडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (एनटीएजीआय) घेण्यास आता या दोन डोसमध्ये अंतर सुचविले आहे. त्यानुसार कोविशिल्डच्या पहिल्या डोसनंतर ६ ते ८ आठवड्यांच्या आत दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. यात लसीची परिणामकारकता व सुरक्षा वृद्धिंगत होत असल्याचे सांगण्यात आलेले आहे. मात्र दोन डोसमधील अंतर सहा ते आठ आठवड्यांपेक्षा अधिक नसावे असे, आरोग्य सचिवांच्या पत्रात स्पष्ट करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविशिल्ड या लसींचे डोस देण्यात येत आहे.
बॉक्स
कोविशिल्डचे १,१३,२०० डोज प्राप्त
जिल्ह्यात आतापर्यंत कोविशील्डचे १,१३,२०० डोस प्राप्त आहेत. यामध्ये १,१६,२२० लाभार्थ्यांचे लक्ष्यांक आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर १४,२२१ व फ्रंट लाईन वर्कर १३,१३७ व ४५ वर्षावरील कोर्मबीड आजाराचे नागरिकांचे ७,४८६ तसेच ६० वर्षांवरील ४६५,८५३ ज्येष्ठ नागरिकांना असे एकूण ८१,८९७ नागरिकांना पहिला डोस देण्यात आलेला आहे. दुसरा डोस ७,६७२ हेल्थ केअर वर्कर, ४,९९२ फ्रंट लाईन वर्करला देण्यात आला. ४५ वर्षांवरील कोमार्बिड आजाराचे नागरिक तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना यांना दुसरा डोसचा कालावधी अद्याप बाकी आहे.
बॉक्स
कोव्हॅक्सिनचे ३३,८६० डोस उपलब्ध
जिल्ह्यात कोव्हॅक्सिनचे ३३,८६० डोस प्राप्त आहेत. यामध्ये १४,३२० लाभार्थ्यांचे लक्षांक आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर २,१४५ व फ्रंट लाईन वर्कर ६२५ व ४५ वर्षांवरील कोमार्बिड आजाराचे नागरिकांचे १,०१९ तसेच ६० वर्षांवरील ६,७९२ ज्येष्ठ नागरिकांना असे एकूण १०,५८१ नागरिकांना पहिला डोस देण्यात आलेला आहे. दुसऱ्या डोस २,१२५ हेल्थ केअर वर्कर, १०७ फ्रंट लाईन वर्करला देण्यात आला व ४५ वर्षांवरील कोमार्बिड आजाराचे नागरिक तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्या डोसचा कालावधी अद्याप बाकी आहे.