कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:15 AM2021-02-16T04:15:41+5:302021-02-16T04:15:41+5:30

पहिल्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधासाठी काम करणा-या फ्रंटलाईन वर्कर्सना ही लस दिली जात आहे. पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनंतर दुसरा डोस ...

The second phase of covid prevention vaccination begins | कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू

कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू

Next

पहिल्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधासाठी काम करणा-या फ्रंटलाईन वर्कर्सना ही लस दिली जात आहे. पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जातो. जिल्ह्यात १६ जानेवारीला या मोहिमेचा शुभारंभ झाला. पहिल्या दिवशी ४४० व्यक्तींनी लस घेतली होती. त्यानंतर लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला. आतापर्यंत सुमारे ११ हजार व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिली. पहिल्या दिवशी लसीकरण झालेल्या व्यक्तींना सोमवारी दुसरा डोस देण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांचा त्यात समावेश होता.

पहिल्या टप्प्यात १६ हजार २६२ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण अपेक्षित आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन दोन लसींचा लसीकरणात समावेश आहे. लसीकरणाचा दुसरा डोसही प्राप्त झाल्याने शरीरात सक्षम प्रतिकारशक्ती यंत्रणा निर्माण होऊन कोरोनावर मात करण्याचा विश्वास निर्माण झाला आहे. ही लस सुरक्षित आहे. पहिल्या टप्प्यातील सर्व कोविड योद्ध्यांनी तातडीने ही लस घ्यावी, असे आवाहन अजय साखरे व उज्ज्वला मोहोड यांनी केले.

Web Title: The second phase of covid prevention vaccination begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.