बच्चू कडूंच्या प्रयत्नातून अचलपूरला दुसरे पोलीस ठाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 06:00 AM2019-09-19T06:00:00+5:302019-09-19T06:00:50+5:30

२२ ऑक्टोबर २००७ रोजी अचलपूर शहरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील अचलपूर शहरात आले असता त्यांच्यापुढे दुसऱ्या पोलीस ठाण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी ठेवली होती. यावर शासनाने अचलपूर पोलिसांकडून सविस्तर प्रस्ताव शासनाने मागविला.

Second police station to Achalpur with the efforts of Bachu Kadu | बच्चू कडूंच्या प्रयत्नातून अचलपूरला दुसरे पोलीस ठाणे

बच्चू कडूंच्या प्रयत्नातून अचलपूरला दुसरे पोलीस ठाणे

Next
ठळक मुद्दे८३ वर्षांनंतर पुनर्जिवित : साडेसहा कोटींचा निधी, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र क्वॉर्टर्स

अनिल कडू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : संवेदनशील असलेल्या अचलपूर शहराला आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून दुसरे पोलीस ठाणे मिळाले आहे. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने तब्बल ८३ वर्षांनंतर सरमसपुरा पोलीस ठाण्याचे पुनर्जिवित झाले असून, यासाठी ६ कोटी ५६ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.
२२ ऑक्टोबर २००७ रोजी अचलपूर शहरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील अचलपूर शहरात आले असता त्यांच्यापुढे दुसऱ्या पोलीस ठाण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी ठेवली होती. यावर शासनाने अचलपूर पोलिसांकडून सविस्तर प्रस्ताव शासनाने मागविला. निर्धारित लोकसंख्या, येणारी धार्मिक स्थळे, लोकांची जातीनिहाय विभागणी आणि समाविष्ट करता येणाºया मोहल्ल्यांची माहिती देत अचलपूर शहरातील सरमसपुऱ्यात नवे पोलीस ठाणे प्रस्तावित केल्या गेले आणि शासनाने त्याला मान्यताही दिली.
सन २००९ मध्ये सरमसपुरा पोलीस ठाण्याकरिता एक पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, २० हवालदार आणि ४० पोलीस कर्मचारी शासनाने मान्य केलेत. सन २००१ च्या जनगणनेनुसार ३० ते ३५ हजार लोकसंख्या विचारात घेतल्या गेली. सरमसपुऱ्यासह मेहराबपुरा, नवबागपुरा, सुलतानपुरा, मंजूरपुरा, रायपुरा, सवईपुरा, नशीबपुरा, जोगीपुरा मिळून अचलपूर शहरातील १२ ते १५ पुरे (मोहल्ले) या नव्या पोलीस ठाण्यांतर्गत समाविष्ट केल्या गेले. या नव्या पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक, त्याचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूरने बनवून गृहविभागाकडे सादर केला. दरम्यान प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली; प्रत्यक्षात मात्र निधी उपलब्ध झाला नाही. यात भाड्याच्या घरातून सरमसपुरा पोलीस ठाण्याचा कारभार सन २०१४ पर्यंत सुरू होता. यावर आमदार बच्चू कडू यांनी शासन दरबारी पाठपुरावा करीत पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय इमारतीकरिता ५६ लाखांचा, तर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाकरिता ६ कोटींचा निधी खेचून आणला.

नव्या इमारतीतून कामकाज
आमदारांच्या प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास ५६ लाख रुपये खर्च करून सरमसपुरा पोलीस ठाण्याची प्रशासकीय इमारत उभी केली. या नव्या इमारतीतून पोलीस स्टेशनचे प्रशासकीय कामकाज सुरू झाले आहे. उपविभागीय अभियंता विजय वाट, शाखा अभियंता गोपाल बकाले यांच्या नियंत्रणात ही इमारत उदयास आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. यात पीआय व एपीआयकरिता दोन स्वतंत्र निवासस्थानांसह ३२ कर्मचाऱ्यांकरिता ३२ क्वॉर्टर्स बांधली जात आहेत.

Web Title: Second police station to Achalpur with the efforts of Bachu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.