अतिसाराचा दुसरा बळी; पत्नीचा मृत्यू, पती रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 11:59 PM2018-05-02T23:59:46+5:302018-05-02T23:59:46+5:30

तिवसा तालुक्यातील धारवाडा (पुनर्वसन) येथील अतिसाराने दुसरा बळी कौंडण्यपूर येथील निर्मला ठाकरे यांचा घेतला. त्यांचा १ एप्रिल रोजी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, गावातील अतिसाराला कारणीभूत पाण्याचा नमुना अहवालासाठी प्रशासनाने दिलेली २ मेची वेळ टळून गेली तरी हा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

Second victim of diarrhea; Wife's death, husband's hospital | अतिसाराचा दुसरा बळी; पत्नीचा मृत्यू, पती रुग्णालयात

अतिसाराचा दुसरा बळी; पत्नीचा मृत्यू, पती रुग्णालयात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कुऱ्हा : तिवसा तालुक्यातील धारवाडा (पुनर्वसन) येथील अतिसाराने दुसरा बळी कौंडण्यपूर येथील निर्मला ठाकरे यांचा घेतला. त्यांचा १ एप्रिल रोजी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, गावातील अतिसाराला कारणीभूत पाण्याचा नमुना अहवालासाठी प्रशासनाने दिलेली २ मेची वेळ टळून गेली तरी हा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.
धारवाडा येथे २८ एप्रिल रोजी पांडुरंग तायवाडे (५०) यांना दूषित पाण्यातून अतिसाराची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गावात अतिसाराची लागण झाल्याचे आरोग्य व्यवस्थेच्या निदर्शनात येताच त्यांनी धारवाडा येथे आपली चमू पाठवून येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आरोग्य शिबिर राबवून काही जणांना तेथेच उपचार दिले. वॉर्ड क्र. २ मधील विहिरीच्या पाण्यातून हा प्रकार उद्भवला. गावातील एका लग्नसमारंभात या विहिरीचे पाणी वापरल्याने नागरिकांना अतिसारचा त्रास झाला.
ही धारवाडाचीच लागण
पांडुरंग तायवाडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेले कौंडण्यपूर येथील शंकर ठाकरे व त्यांच्या पत्नी निर्मला ठाकरे हे दोन दिवस धारवाडा येथे राहिले. अतिसाराचा त्रास सुरू झाल्याने ते ३० एप्रिलला कौंडण्यपूर येथे परतले.
ठाकरे दाम्पत्याने उपचारासाठी आर्वी ग्रामीण रुग्णालय गाठले. त्यांना संडास-उलट्यांचा त्रास जास्त असल्याने अ‍ॅडमिट करून घेतले. उपचारादरम्यात निर्मला ठाकरे यांचा १ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास मृत्यू झाला. अतिसारातून झालेल्या जंतुसंसर्गामुळे मृत्यू झाल्याचे आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कोल्हे यांनी सांगितले. घटनेचे गांभीर्य पाहता, त्यांचे पती शंकर ठाकरे यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले असून, धारवाडा येथील तीन ते चार रुग्ण अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली.
आरोग्य यंत्रणेची सारवासारव, तीन रुग्ण उपचारासाठी अमरावतीत
इतर ठिकाणीही साथ!

अतिसाराने एकापाठोपाठ बळी जाणे हे आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचे उदाहरण आहे. धारवाडा येथे आलेली पाहुणे मंडळी आपआपल्या गावी गेली आहेत. तेथेही अतिसाराचा जंतुसंसर्ग फैलण्याची भीती आहे.
यंत्रणा कुचकामी
२८ एप्रिलपासून चार दिवस होऊनही पाणी नमुना तपासणी अहवाल आलेला नाही. त्यावरूनच या प्रकरणात आरोग्य अधिकारी व यंत्रणा किती गंभीर आहे, हे दिसून येते. सतत चार दिवस शासकीय सुट्या असल्यामुळे पाणी तपासणी अहवाल येऊ शकला नाही, अशी कारणे आरोग्य विभाग असले तरी २ एप्रिलच्या दुपारपर्यंतही अहवालाची प्रतीक्षा होती.

सदर महिला हृदयविकाराने दगावल्याची माहिती आहे. कौंडण्यपूरला पथक पाठविले. धारवाडाला दोन डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांचे पथक सात दिवस राहणार आहे. तेथील दूषित पाण्याचा चाचणी अहवाल अद्याप अप्राप्त आहे.
सुरेश असोले,
जिल्हा आरोग्य अधिकारी

आईला घरी असताना माझ्यासमोर दोन वेळा उलट्या झाल्या होत्या. संडासचा त्रास होता. आई-वडिलांना आर्वी येथे दवाखान्यात दाखविले असता येथे आईचा मृत्यू झाला. आता बाबाची प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.
- सचिन ठाकरे,
मृताचा मुलगा

Web Title: Second victim of diarrhea; Wife's death, husband's hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.