दुसऱ्या लाटेने नैराश्यात भर, औषधांच्या किमतीत वाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:10 AM2021-06-23T04:10:08+5:302021-06-23T04:10:08+5:30
(असाईनमेंट) अमरावती : कोरोनाकाळात बहुतांश नागरिक घरात बंदिस्त होते. कोणी कुटुंबात, काही एकाकी, कोणी विलगीकरणात होते. याशिवाय येणाऱ्या व ...
(असाईनमेंट)
अमरावती : कोरोनाकाळात बहुतांश नागरिक घरात बंदिस्त होते. कोणी कुटुंबात, काही एकाकी, कोणी विलगीकरणात होते. याशिवाय येणाऱ्या व भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे शंकेने पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे एन्क्झायटी वाढून काही नागरिकांना डिप्रेशन आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यासोबतच आर्थिक ताण वाढून नैराश्यात भर पडल्याची असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले.
काही नागरिकांनी तणावाच्या प्रसंगी भक्कम राहिल्याने व त्यांना कुटुंबाचा साथ मिळाल्याने या प्रकारावर अगदी सहजतेने मात केली. किंबहुना, त्यांना या प्रकाराची कुठलीही झळ पोहोचली नाही. मात्र, काहींचा कुटुंबीयांशी संवाद नाही, नोकरीनिमित्त घराबाहेर किंवा काही नागरिकांचा कोरोनाकाळात रोजगार हिरावला व या परिस्थितीत मनमोकळा संवाद साधण्यासाठी कुणीही नाही, अशा परिस्थितीत काही नागरिकांना नैराश्याचे आजार जडावले. या आजारावरील औषधांच्या विक्रीत काही प्रमाणात वाढ झालेली आहे.
केवळ पुरुषच नव्हे तर स्त्रियादेखील मानसिक आजाराला बळी पडल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले. यामध्ये केवळ युवाच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकांनाही उदासीनतेने ग्रासले असल्याचे दिसून आले आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ७० हजारांवर रुग्ण व एक हजारांवर नागरिक कोरोनाचे बळी ठरले. या काळात बहुतेक कुटुंबांशी निगडीत कुणाला न कुणाला संसर्गाने ग्रासले व परिणामी नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन नैराश्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.
बॉक्स
डिप्रेशन का वाढले?
* कोरोनाकाळात असुरक्षित असल्याची भवाना निर्माण झाली. सतत घरात कोंडल्यासारखे राहणे, रोजगार गमाविल्याने भविष्याची चिंता, याशिवाय कुटुंबातील कुणाला संसर्ग किंवा कोणी गमाविल्याने व सतत कोरोना संसर्गाच्या चर्चा कानावर पडत असल्याने नैराश्य वाढण्याचे प्रकार घडले आहे.
* कोरोनाकाळात विलगीकरण, इतरांशी संवाद कमी होणे, घरातील आर्थिक विवंचना, कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती या सर्व प्रकारांमुळे आपसातील संवाद कमी झाला. यामुळे बैचेनी व परिणामी डिप्रेशन वाढल्याचे प्रकार घडल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले.
बॉक्स
नैराश्य टाळण्यासाठी हे उपाय
१) कोरोनामुळे येणारे नैराश्य टाळण्यासाठी वेळेवर आहार, किमान आठ तास झोप, कुठल्याही कामात व्यस्त राहणे महत्त्वाचे आहे. या बाबी प्राथमिक असल्याची माहिती मानसोपचारतज्ज्ञांनी दिली.
२) आपल्या मनातील गोष्टी मित्र, कुटुंबीयांशी शेअर करा. स्वत:ला उदासीनता येत असेल, तर लगेच आळस झटकून कुठल्याही कामात स्वत:ला गुंतविणे हे महत्त्वाचे आहे.
३) काहींना मानसिक आधाराची गरज असते. तेव्हा समुपदेशन करणे महत्त्वाचे आहे. यामळे उदासीनतेमधून बाहेर निघण्यास मोठी मदत होते. यासाठी कुटुंबीय, मित्रांचा खूप महत्त्वा रोल आहे.
बॉक्स
प्रामुख्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डिप्रशनचे रुग्ण वाढले आहेत, भीतीयुक्त वातावरण, घरात कोंडून राहणे, कुणाजवळ भावना व्यक्त न होणे कोरोना तर नाही अशा शंकायुक्त नजरा, याशिवाय रोजगार हिरावणे, आर्थिक विवंचना यामुळे बेचैनी व उदासीनतेचे रुग्ण वाढले आहेत.
- डॉ. अतुल पाटील, मानसोपचारतज्ज्ञ
कोट
चार महिन्यांपासून दिवसाला चार ते पाच प्रिस्किप्शन या आजारावरील येत आहेत. यापूर्वी ही संख्या दोन, फार तर तीन अशी राहायची. आता ताण-तणाव वाढले आहेत. आम्ही डॉक्टरांच्या प्रिस्किप्शनशिवाय औषधी देत नाही.
- एक औषध विक्रेता, रुक्मिणीनगर
कोट
दीड वर्षांत किमान सहा महिने व्यवसाय बंद राहिला. दुकानाचे भाडे, नोकरांचे पगार कसे द्यावे, याचे सतत विचार डोक्यात यायचे. यामुळे उदासीनता व बेचैनी वाढली होती. डॉक्टरांच्या समुपदेशन व औषधांमुळे आता यामधून बाहेर आलो व कुठल्याही संकटाचा सामना करण्यास तयार आहे.
- एक व्यावसायिक, जवाहर रोड