कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:12 AM2021-04-16T04:12:27+5:302021-04-16T04:12:27+5:30

अमरावती : युरोपीयन देशांत कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यामुळे राज्याच्या आरोग्य संचालकांनी ११ नोव्हेंबर रोजी आरोग्य यंत्रणांना पूर्वतयारीसाठी अलर्ट ...

The second wave of the corona was expensive | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष पडले महागात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष पडले महागात

Next

अमरावती : युरोपीयन देशांत कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यामुळे राज्याच्या आरोग्य संचालकांनी ११ नोव्हेंबर रोजी आरोग्य यंत्रणांना पूर्वतयारीसाठी अलर्ट दिला होता. मात्र, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष अथवा लिखापोती करणे आता आरोग्य यंत्रणेच्या अंगलट आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असताना यंत्रणांची तारांबळ उडाल्याचे दिसून येत आहे.

राज्यात ऑक्टोबरअखेर कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असताना जागतिक स्तरावरील कोरोना उद्रेकाचे अवलोकन केले असता, तेथे कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांना याविषयीचा अलर्ट देण्यात आलेला होता. यात संसर्ग कमी असतानाही प्रयोगशाळा सर्वेक्षण सुरू ठेवणे, चाचणी केंद्रांची संख्यावाढ करणे व यात कुठेही हलगर्जीपणा न करण्याचे आरोग्य संचालकांनी निर्देशित केले होते. याशिवाय दुसऱ्या लाटेच्या सतर्कतेचा इशारा वेळेवर मिळावा, यासाठी फ्ल्यूसदृश रुग्णांवर नियमित उपचार करणे व यामध्ये शहरी व ग्रामीण भागातील फिवर क्लिनिक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, अशी सूचना करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला याचा विसर पडला.

याशिवाय एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम (आयडीएसपी) अंतर्गत ग्रामीण भागातील पीएचसी, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये यांच्याकडून इंफ्लुएंझा सदृश रुग्णांच्या आठवडी अहवालाची नियमित होऊन साप्ताहिक ट्रेंड समजून घेणे व याच पद्धतीचे सर्वेक्षण महापालिकेच्या शहरी आरोग्य केंद्रांमार्फत व निवडक खासगी रुग्णालयामार्फत करणे महत्त्वाचे आहे. याशिवाय गृहभेटीद्वारे सर्वेक्षण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिक वेगाने व युद्धपातळीवर करण्याचे निर्देशित करण्यात आले होते. प्रत्यक्षात जिल्ह्यात फक्त लिखापोतीच झाल्यामुळे आता धावपळ करावी लागत आहे.

बॉक्स

सुपरस्प्रेडर्सच्या चाचण्या अगोदरच का नाही?

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर जिल्हा व महापालिका प्रशासनाला जनसंपर्क अधिक असणाऱ्या (सुपरस्प्रेडर्स) व्यक्तीच्या कोरोना चाचण्या करण्याची गरज वाटली. मात्र, या नियमित तपासण्या डिसेंबरनंतर करणे सुरू असत्या तर ही धावपळ करण्याची वेळ आली नसती. आता या विक्रेत्यांना वेठीस धरण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप केला जात आहे.

बॉक्स

कोमार्बिडिटी क्लिनिक आहेत कुठे?

ज्यांचे वय ६० चे वर आहेत आणि ज्यांना अतिजोखमीचे (कोमार्बिडिटी)आजार आहेत, त्यांच्यावर नियमित उपचार आणि ते नियंत्रित ठेवण्याबाबत समूहाला मार्गदर्शन करण्याचे सुचविण्यात आले होते. या रुग्णांसाठी कोमार्बिडिटी क्लिनिक सुरू करण्याचे निर्देशित करण्यात आलेले असताना जिल्ह्यात उपाययोजना कागदावरच राहिलेल्या आहेत.

पाईंटर

जिल्ह्यातील संक्रमित : ५४४९७

आतापर्यंत बाधितांचे मृत्यू : ७४९

एकूण कोरोनामुक्त : ५०१६०

सध्याची पॉझिटिव्हिटी : ३५८८

Web Title: The second wave of the corona was expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.