रेल्वेस्थानकाची सुरक्षा, स्वच्छतेचा ‘डीआरएम’ दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 10:13 PM2017-09-04T22:13:04+5:302017-09-04T22:13:24+5:30

दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भुसावळ मध्य रेल्वेचे प्रबंधक रामकरण यादव यांनी....

Security of the railway station, cleanliness 'DRM' tour | रेल्वेस्थानकाची सुरक्षा, स्वच्छतेचा ‘डीआरएम’ दौरा

रेल्वेस्थानकाची सुरक्षा, स्वच्छतेचा ‘डीआरएम’ दौरा

Next
ठळक मुद्देअमरावती, बडनेºयाची पाहणी : गार्ड, चालकांची सुविधा तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भुसावळ मध्य रेल्वेचे प्रबंधक रामकरण यादव यांनी शुक्रवारी बडनेरा व अमरावती रेल्वेस्थानकाची पाहणी केली. यावेळी रेल्वेच्या सर्वच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भुसावळ मध्य रेल्वेचे प्रबंधक रामकरण यादव हे महाराष्ट्र एक्स्प्रेसने स्पेशल कोचमधून १ सप्टेंबर रोजी बडनेरा रेल्वेस्थानकावर आले. दुरांतो एक्स्प्रेसचे नऊ डबे रुळावरून घसरल्यानंतर हा पाहणी दौरा असल्यामुळे रेल्वे प्रशासनाचे प्रमुख अधिकारी खासकरून उपस्थित होते. बडनेरा रेल्वे स्थानकावरील रनिंग रूम, गार्ड लॉबी, खानावळ स्टॉल्स, पाण्याचे स्टँड, ट्रॅकच्या अवती-भवतीची माहिती, प्रवासी विश्रामगृह, शौचालये यांसह इतरही बाबी त्यांनी तपासल्यात. तसेच सुरक्षेच्या व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून काही सूचनादेखील दिल्यात. बडनेरा स्थानकाची पाहणी केल्यानंतर त्यांनी अमरावती रेल्वे स्थानकाची पाहणी केली. दरम्यान सर्वच बाबींची बारकाईने तपासणी करण्यात आली. यावेळी स्टेशनमास्तर आर.डब्ल्यू निशाने, आर.टी.कोटांगळे, वाणिज्य निरीक्षक शरद सयाम, व्ही.डी. कुंभारे, डीएमओ नितीन वेटे, किशोर लोहबरे, आयडब्ल्यूचे वासेकर, आरक्षण प्रमुख चारदिवे, मुख्य टीसी वकील खान, प्रमोद वाडेकर यांसह इतरही अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Security of the railway station, cleanliness 'DRM' tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.