पाचशे कोटींच्या शहानूर प्रकल्पाची सुरक्षा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:03 PM2018-05-25T23:03:57+5:302018-05-25T23:04:48+5:30

अचलपूर तालुक्यातील पाचशे कोटींचा शहानूर मध्यम प्रकल्प प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्षित केला आहे. धरणाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे व धोकादायक रेनकट्स आहेत. यामुळे प्रकल्पालाच धोका निर्माण झाला आहे. प्रकल्पावर कुठेही स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे हा प्रकल्प वाऱ्यावर आहे. प्रकल्पाची आणि प्रकल्पावर येणाºया पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

Security threat to 500 crores Shanoor project | पाचशे कोटींच्या शहानूर प्रकल्पाची सुरक्षा धोक्यात

पाचशे कोटींच्या शहानूर प्रकल्पाची सुरक्षा धोक्यात

googlenewsNext
ठळक मुद्देधोकादायक रेनकट्स : धरणाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे, प्रकाश व्यवस्था नाही, संगणकीय यंत्रणा बंद, रस्ताच शिल्लक नाही

अनिल कडू।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील पाचशे कोटींचा शहानूर मध्यम प्रकल्प प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्षित केला आहे. धरणाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे व धोकादायक रेनकट्स आहेत. यामुळे प्रकल्पालाच धोका निर्माण झाला आहे. प्रकल्पावर कुठेही स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे हा प्रकल्प वाऱ्यावर आहे. प्रकल्पाची आणि प्रकल्पावर येणाºया पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
अचलपूर तालुक्यातील वाघोली गावाजवळ शहानूर नदीवर हा प्रकल्प आहे. १९८९ मध्ये पूर्ण झालेल्या या धरणावर ९ हजार ३३० हेक्टर सिंचन अपेक्षित आहे. या प्रकल्पावरील मुख्य धरणाची लांबी ७९५ मीटर, तर उंची ५६.४५ मीटर आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा ४६.०४ द.ल.घ.मी. असून, पूर्ण संचय पातळी ४४२.५० मीटर आहे.
सिंचनासह पिण्याच्या पाण्याकरिता वरदान ठरलेले शहानूर धरण उंचावर आहे. यामुळे आपत्कालीन स्थिती लवकरच निर्माण होते. धरणावरील आपत्कालीन स्थितीवर लक्ष ठेवण्याकरिता संगणकीय यंत्रणा बसविण्यात आली होती. पण, ही संगणकीय यंत्रणा काही वर्षांपासून प्रकल्पस्थळी धुळखात आहे. त्यावर अनेकांनी त्यावर ताशेरे ओढले आहे. महालेखापरीक्षकांनी तर त्यावर आॅडिट पॅरा काढला असून, आजही तो आॅडिट पॅरा कायम आहे.
धरणावर २४ तास विजेचा पुरवठा अत्यावश्यक ठरतो. पण, शहानूर धरणाला गावठाण फीडरवरून तेथे होणारा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. धरणावर एक जनरेटर आहे. पण या जनरेटरची स्थितीही नाजूक आहे.
भिंतीवरून धरणाच्या गेटकडे जाणाºया मार्गातील १७ खांबांपैकी एकावरही दिवा नाही. कव्हरही फुटलेले, तुटलेले, वायर कापलेले आहेत. या दरम्यान सोलर दिव्याचे उंचीला लहान असलेले चार खांब आहेत. यातील एकाच खांबावर दिवा असून, तो चालू की बंद, हे ठरवता येत नाही. प्रकल्पस्थळावरची प्रकाश व्यवस्था कोलमडल्याने सर्वत्र काळोख असतो. याशिवाय कुठेही स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे पाचशे कोटींचा हा प्रकल्प वाºयावर आहे. प्रकल्पाची आणि प्रकल्पावर येणाºया पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
झाडांचा नायनाट केव्हा?...: मुख्य धरणाच्या खालच्या बाजूस हे रेनकट्स आहेत. पावसामुळे पडलेल्या लहान-मोठ्या भेगा आणि रेनकट्स पावसाळ्यापूर्वीच दुरूस्त करणे अत्यावश्यक ठरतात. पावसाळा तोंडावर आला असला तरीही धरणाच्या भिंतीवरील झाडे आणि रेनकटस् आजही तशीच आहेत.
लिम्कामध्ये विक्रमाची नोंद...: अंजनगाव-दर्यापूर तालुक्यातील १५४ गावांची पाणीपुरवठा योजना याच धरणावर आहे. पथ्रोटकरिता प्रस्तावित पाणीपुरवठा योजना याच धरणावरून असून कामास सुरुवात झाली आहे. १५४ गावांच्या पाणीपुरवठा योजनेची लिमका बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
धरणाच्या भिंतीवर झाडे...
तज्ज्ञांच्या मते धरणाच्या भिंतीवर झाडे नकोत. असल्यास ती काढून त्यांची मुळं पेट्रोल टाकून जाळून टाकायला हवीत. पण, याबाबत धरणावर कुठलेही नियोजन बघायला मिळत नाही.
डांबरी रस्ताही उद्ध्वस्त
शहानूर धरणावर जाण्याकरिता परतवाडा-अंजनगाव रोडवर पांढरी गावापासून आठ किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता आहे. दोन किलोमीटरचा अपवाद वगळता या रस्त्यावर मोठे खड्डे आहेत. प्रकल्पावर सिंचनादरम्यान निर्माण होणाºया विजेची निर्मिती २०१५-१६ पासून बंद पडली आहे.

Web Title: Security threat to 500 crores Shanoor project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.