बियाणे वाटपाची प्रक्रिया ऑफलाईन करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:12 AM2021-05-24T04:12:15+5:302021-05-24T04:12:15+5:30
भाजप तिवसा ची मागणी तिवसा : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात येत असताना ते तातडीने मिळावे, ...
भाजप तिवसा ची मागणी
तिवसा : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात येत असताना ते तातडीने मिळावे, तसेच बियाणे मिळण्याकरिता दिलेली मुदत अल्प असून, त्यात वाढ करावी. आपले सेवा केंद्र बंद असल्यामुळे ऑफलाईन अर्ज स्वीकारावे, अशी मागणी तिवसा तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, तीळ, बीटी कापूस, ज्वारी, मका बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी २० मेपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ती मुदत वाढवून देण्यात यावी. ३१ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे आपले कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली नाही. यामुळे महाडीबीटी पोर्टलमार्फत ऑनलाईन अर्ज करणे शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे ऑनलाईन योजना राबवून शेतकऱ्यांना या योजनेचा उपयोग घेता आला पाहिजे, यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.