सात लाख हेक्टरमधील पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2017 12:04 AM2017-06-25T00:04:52+5:302017-06-25T00:04:52+5:30

रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्रावर शेतकऱ्यांची मदार होती.

Seed extraction in seven lakh hectare | सात लाख हेक्टरमधील पेरण्या खोळंबल्या

सात लाख हेक्टरमधील पेरण्या खोळंबल्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्रावर शेतकऱ्यांची मदार होती. मात्र या नक्षत्रातील चार दिवस कोरडे गेल्याने शेतकऱ्यांसमोर समोर नवे संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यात अद्याप ६ लाख ८० हजार हेक्टरमध्ये पेरण्या खोळबंल्या आहेत. पाऊसच नसल्याने बियाणे बाजार थंडावला आहे.
यंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे. मृग नक्षत्रापूर्वी शेतकऱ्यांनी शेतांची खरीपपूर्व मशागत केली. पाऊस येणार या अपेक्षेने किमान ४० हजार हेक्टरमध्ये पेरणी केली. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने बिजांकुरण झालेच नाही. त्यामुळे बियाणे कुजायला लागले. ज्या ठिकाणी बिजांकुरण झाले, त्या ठिकाणी इवलीशी रोपे करपायला लागली.त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी धारणी तालुक्यात ४६ हजार ६४२ हेक्टर,चिखलदरा २५ हजार २५४ हेक्टर, अमरावती ५७ हजार ७९१ हेक्टर, भातकूली ५० हजार ३५५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ६७ हजार ७७३, चांदूर रेल्वे ४२ हजार ६५१ हेक्टर, तिवसा ४५ हजार ४४४ हेक्टर, मोर्शी ६२ हजार ८४१ हेक्टर,वरूड ४८ हजार ६४६ हेक्टर, दर्यापूर ७० हजार ६६४ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ४५ हजार ५०३ हेक्टर,अचलपूर ४७ हजार ९८३ हेक्टर, चांदुर बाजार ६० हजार ९९७ हेक्टर, व धामणगाव रेल्वे तालुक्यात ५५ हजार ४३८ हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे.
असे आहे तालुकानिहाय पेरणी झालेले क्षेत्र
४जल्ह्यात सद्यस्थितीत ३८,७४४ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ४१ टक्के म्हणजेच १८,९२९ हेक्टरवर धारणी तालुक्यात पेरणी झाली आहे. अमरावती ४१४ हेक्टर, भातकुली २४५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ३०८ हेक्टर, चांदूर रेल्वे १३० हेक्टर, तिवसा २८४ हेक्टर, मोर्शी २,९२९ हेक्टर, वरूड ३,०९३ हेक्टर, दर्यापूर १२ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ४९० हेक्टर, अचलपूर ७७६ हेक्टर, चांदूरबाजार १,१३१ हेक्टर, धामणगाव रेल्वे तालुक्यात १० हजार तीन हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. यामधील किमान ३० हजार हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणीचे सावट आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहे.

२४ दिवसांत केवळ
७३ मि.मी. पाऊस
जिल्ह्यात १ ते २४ जूनदरम्यान ११६.९ मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्ष ७३.२ मि.मी. पाऊस पडला आहे. ही ६२.६ टक्केवारी आहे. आतापर्यंत अमरावती तालुक्यात ८७, भातकुली ५१.३, नांदगाव ८६.८,चांदूररेल्वे ८४.१, धामणगाव रेल्वे ८८.१, तिवसा ७२, मोर्शी ७३.६, वरूड ५५.५, अचलपूर ५९.७, चांदूरबाजार ५४.९,दर्यापूर ७६.६, अंजनगाव सुर्जी ५९.८, धारणी ७१.२ व चिखलदरा तालुक्यात १०३.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
मान्सूनची स्थिती
वायव्य राजस्थान ते वायव्य बंगालचा उपसागरदरम्यान कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात तीन किमीवर चक्राकार वारे व उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ दरम्यान कमी दाबाची द्रोणीय स्थिती असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली.

Web Title: Seed extraction in seven lakh hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.