सेमाडोहचा मोतीनाला पूल उठलाय जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:44 AM2018-04-26T01:44:16+5:302018-04-26T01:56:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : परतवाडा-इंदूर या आंतरराज्यीय महामार्गावरील सेमाडोह नजीकचा मोतीनाला पूल अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे. वर्षभरात २५ वाहने या पुलावरून कोसळले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कमालीचे दुर्लक्ष प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे. मंगळवारी रात्री पुन्हा दुचाकीसह दोन युवक पुलाखाली कोसळल्याने गंभीर जखमी झालेत.
सेमाडोह मार्गावरील भूमका बाबा नजिक इंग्रज कालीन मोतीनाला पूल आहे मंगळवारी सुनील बाबु भिलावेकर 36 राजेश चुन्या जावरकर 32 रा सेमाडोह दुचाकीने धारणी वरून सेमाडोह येते येत असताना रात्री दहा वाजताच्या दरम्यान अंधारात पुलावरून दुचाकी २० फूट खोल कोसळल्याने दोघे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच सेमाडोह येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप भारवे बाबु सेमलर गौरव इंगोले कालू गोहालकर गोड? अजमिरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका नेऊन पुलाखाली कोसळलेल्या गंभीर जखमी दोघांना आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले.
वर्षभर अपघातांची मालिका
सेमाडोह नजीकच्या मोतीनाला पुलाला सुरक्षित कठडे नसल्याने वाहने खाली कोसळण्याच्या घटना सतत घडताहेत. गत महिन्यात एकाचा मृत्यू झाला. हा आंतरराज्यीय महामार्ग असताना सतत अपघाताची मालिका घडूनही येथे कुठल्याच प्रकारची व्यवस्था नाही.सदर महामार्ग चौपदरीकरणाचा होणार असल्याचे घोषणा झाली आहे. जुन्या पुलावर तत्काळ सुरक्षेच्या दृष्टीने कठडे लावण्याची मागणी भाजपचे शिवा काकड यांनी केली. यासंदर्भात सा.बां.चे उपविभागीय अभियंता नितीन देशमुख यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.