साद्राबाडी गावात लागले भूकंपमापक यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:32 PM2018-08-25T22:32:54+5:302018-08-25T22:33:15+5:30

मेळघाटातील साद्राबाडी गावातील धरणीकंपाची भीती नागरिकांच्या मनातून दूर करण्यासाठी शनिवारी एनसीएस दिल्लीचे पथक गावात दाखल झाले. त्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत भूकंपमापक यंत्र लावले आहे, त्यावर हादऱ्यांची नोंद होणार आहे.

Seismologist at the village of Saadrabadi | साद्राबाडी गावात लागले भूकंपमापक यंत्र

साद्राबाडी गावात लागले भूकंपमापक यंत्र

Next
ठळक मुद्देदिल्लीची टीम : एनसीएसचे पथक दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : मेळघाटातील साद्राबाडी गावातील धरणीकंपाची भीती नागरिकांच्या मनातून दूर करण्यासाठी शनिवारी एनसीएस दिल्लीचे पथक गावात दाखल झाले. त्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत भूकंपमापक यंत्र लावले आहे, त्यावर हादऱ्यांची नोंद होणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, साद्राबाडी येथील नागरिकांनी आतापर्यंत दीडशेवर जबर हादरे अनुभवले असून, ते नेमके भूकंपाचेच आहेत का, याचा निष्कर्ष काढण्याकरिता एनसीएसचे पथक गावात पोहचले आहे. त्या पथकातील बबनसिंग आणि कुलबीरसिंग यांनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत भूमापक यंत्र स्थापित केले. त्या यंत्रामध्ये हादरे नोंदविले जातील. त्यांची तीव्रता, कंपन यावरून काही माहिती पथकाच्या हाती येईल. हे भूमापक यंत्र पुढील सात दिवस गावात कायम राहणार आहे.
हादरे झाले कमी
जीएसआय पथकाने शुक्रवारी दुपारी २.२१ वाजता सौम्य कंपन अनुभवले होते. त्यानंतर ३ ते ४ दरम्यान दोन व त्यानंतर पहाटे ५.३० वाजता जबर धक्का अनुभवला. तथापि, शुक्रवारपासून धक्क््यांचे प्रमाण कमी झाल्याचा अनुभव आला. जीएसआय पथकाने नागरिकांची भीती घालवल्याने ते घरात झोपत आहेत.

Web Title: Seismologist at the village of Saadrabadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.