बनावट बीअरचा साठा जप्त

By admin | Published: September 13, 2015 12:04 AM2015-09-13T00:04:18+5:302015-09-13T00:04:18+5:30

भिवकुंडी येथे ठाणेदार सुधीर पाटील आणि त्यांच्या चमुने धाड टाकून मध्य प्रदेशातून तस्करीव्दारे आणलेला ‘बीअर’चा साठा जप्त केला.

Seized of fake beer | बनावट बीअरचा साठा जप्त

बनावट बीअरचा साठा जप्त

Next

मोर्शी पोलिसांची कारवाई : १ लाख १३ हजारांचा माल
मोर्शी : भिवकुंडी येथे ठाणेदार सुधीर पाटील आणि त्यांच्या चमुने धाड टाकून मध्य प्रदेशातून तस्करीव्दारे आणलेला ‘बीअर’चा साठा जप्त केला. मागील १५ दिवसांत पोलिसांनी अवैध दारू आणि वाहनांसह जवळपास १ लक्ष १३ हजार रुपयांचा माल जप्त केला. जुगार खेळणाऱ्यांवर धाडी टाकून अनेकांना अटक केली आहे.
भिवकुंडी येथे आरोपी भाऊराव मरसकोल्हे (३८) याने पोळ्याच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात बियर आणून ठेवल्याची माहिती ठाणेदार सुधीर पाटील यांना मिळाली. त्यांनी आरोपी भाऊराव मरसकोल्हे याच्या घरावर धाड टाकून मध्य प्रदेशातून आणलेल्या बीअरचा ३१ हजार रुपयांचा साठा जप्त केला आणि आरोपीला अटक केली. ठाणेदार सुधीर पाटील यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक फुलेकर, जमादार शेंडे, उदापुरे, राजकुमार, पोलीस राऊत, चालक कडू यांनी ही कामगिरी पार पाडली.
पोळा आणि पुढे येणाऱ्या गणेशोत्सवाकडे पाहता मागील १५ दिवसांत मोर्शी पोलिसांनी जुगार आणि अवैध दारु विक्रेत्यांविरुध्द धाड सत्र राबविले आहे.
जुगाराच्या एकूण १३ धाडी टाकून ४५ आरोपींविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचेकडून २८,९३० रुपये जप्त करण्यात आले आहे. याशिवाय अवैध दारु विक्रेत्यांविरुध्द १४ धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यांच्याजवळून एकूण १ लक्ष १३ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
विशेष असे की, अवैध दारू वाहतुकीप्रकरणी जप्त करण्यात आलेली वाहने सरकारजमा करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आल्याचे ठाणेदार सुधीर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अवैध दारू आणि जुगाराविरुध्द धाडसत्र सातत्याने पुढे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Seized of fake beer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.