अवैध रेतीसह ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:17 AM2021-09-17T04:17:12+5:302021-09-17T04:17:12+5:30

बेलोरा येथे विवाहितेचा छळ चांदूर बाजार : तालुक्यातील बेलोरा येथे १ सप्टेंबर रोजी मद्यधुंद अवस्थेत प्रशांत दिवाकर राऊत याने ...

Seized tractor with illegal sand | अवैध रेतीसह ट्रॅक्टर जप्त

अवैध रेतीसह ट्रॅक्टर जप्त

Next

बेलोरा येथे विवाहितेचा छळ

चांदूर बाजार : तालुक्यातील बेलोरा येथे १ सप्टेंबर रोजी मद्यधुंद अवस्थेत प्रशांत दिवाकर राऊत याने ३० वर्षीय पत्नीला शिवीगाळ केली व मारहाण केली. माहेरहून पैसे आण, असे म्हणत तो शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याची तक्रार चांदूर बाजार पोलीस ठाण्यात तिने दाखल केली. पोलिसांनी १५ सप्टेंबर रोजी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

बाभूळखेडा येथे महिलेचा विनयभंग

वरूड : तालुक्यातील बाभूळखेडा येथे ३३ वर्षीय महिला घरी एकटी असल्याचे पाहून विनोद हरिभाऊ मोहोड याने तिचा हात पकडला व तुझ्यासोबत प्रेम करायचे आहे, असे म्हणून विनयभंग केला. याप्रकरणी वरूड पोलिसांनी बुधवारी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

दिव्यांग जावयाला सासऱ्याकडून मार

मोर्शी : एका पायाने अधू असलेल्या जावयाला पत्नीच्या मोठ्या वडिलांनी काठीने मारहाण केल्याचे प्रकरण चिखलसावंगी येथे उघड झाले. अजय सुधाकर मोंढे (३४) असे जावयाचे नाव आहे. त्याने पत्नीला शेतात मजुरांच्या मागे राहा, असे सांगितले. पत्नीने नकार दिल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. ह वाद ऐकताच शेजारी राहणाऱ्या विजय इंगळेने काठीने अजयच्या डोक्यावर मारले. त्यामुळे डोके फुटून रक्त निघाले. मोर्शी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

--------------

खामगावात विवाहितेचा सासरकडून छळ

भातकुली : खामगाव येथे दिलेल्या २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळीकडून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याची तक्रार खोलापूर पोलीस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तुषार प्रल्हादराव चिमकर (३३), प्रल्हादराव गंगाराम चिमकर, राहुल प्रल्हादराव चिमकर व एक महिला (रा. किसननगर, घाटपुरी रोड, खामगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------

Web Title: Seized tractor with illegal sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.