चांदूर बाजारात २७८ शेतकऱ्यांची अनुदानित बियाण्यांसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:29+5:302021-06-10T04:10:29+5:30

या शिवाय शेतकऱ्यांना,ईतर योजनांचेही बियाणे मिळणार. पान ३ वर चांदूर बाजार : कृषी विभागाने २० मेपर्यंत राष्ट्रीय अन्न ...

Selection of 278 farmers for subsidized seeds in Chandur market | चांदूर बाजारात २७८ शेतकऱ्यांची अनुदानित बियाण्यांसाठी निवड

चांदूर बाजारात २७८ शेतकऱ्यांची अनुदानित बियाण्यांसाठी निवड

Next

या शिवाय शेतकऱ्यांना,ईतर योजनांचेही बियाणे मिळणार.

पान ३ वर

चांदूर बाजार : कृषी विभागाने २० मेपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत गळितधान्य व कडधान्याच्या अनुदानावरील बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले होते. तालुक्यातील १ हजार ११८ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. त्यामधून लॉटरी पद्धतीने २७८ शेतकऱ्यांची अनुदानित बियाण्यांसाठी निवड करण्यात आली.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत खरीप २०२१-२२ साठी गळितधान्य सोयाबीनकरिता एकूण ९५६ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यापैकी २०९ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. या योजनेतील कडधान्य तूर बियाण्यासाठी १६२ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यापैकी ६९ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. ही निवड राज्यस्तरावरून करण्यात आली. सदर योजनेंतर्गत बियाण्यावर शेतकऱ्यांना एकूण २ लाख ९८० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. यात सोयाबीन बियाण्यासाठी,१ लाख ९० हजार ८० रुपये तसेच तूर बियाण्यासाठी १० हजार ९०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय तालुक्यातील शेतकऱ्यांना याच योजनेंतर्गत पीक प्रात्यक्षिकासाठी सोयाबीन व तूर बियाणेही अनुदानावर मिळणार आहेत. यामध्ये गळितधान्य प्रात्यक्षिक अंतर्गत १२० हेक्टरसाठी सोयाबीन बियाणे तसेच आंतरपीक योजनेंतर्गत ६० हेक्टर क्षेत्रासाठी सोयाबीन व तूर बियाणे मिळणार आहे. कडधान्य प्रात्यक्षिक अंतर्गत ७० हेक्टरसाठी तूर बियाणे अनुदानावर मिळणार आहे. या प्रात्यक्षिकांसाठी तालुक्यातील काही गावांची निवड करण्यात आली आहे. या निवड करण्यात आलेल्या गावातील शेतकऱ्यांनाच प्रात्यक्षिकांचे अनुदानावरील बियाणे मिळणार आहे.

--------------

लाॅटरी पध्दतीने निवड झालेल्या शेतकऱ्यांचे बियाणे महाबिजच्या अधिकृत विक्रेत्याकडे उपलब्ध झाले आहे. बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयामधून परमिट देणे सुरू आहे. परमिटनुसार अनुदानाची रक्कम वगळता बियाण्याची उर्वरित रक्कम विक्रेत्यास शेतकऱ्यांनी द्यावयाची आहे. काही शेतकऱ्यांनी बियाण्याची उचल केली आहे. प्रात्यक्षिकांचे बियाणे मात्र अद्याप उपलब्ध व्हायचे आहे.

- अंकुश जोगदंड, तालुका कृषी अधिकारी, चांदूर बाजार

Web Title: Selection of 278 farmers for subsidized seeds in Chandur market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.