शिक्षण उपसंचालक कार्यालयातील बडे बाबू ‘ट्रॅप’, एसीबीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 12:46 PM2023-06-22T12:46:49+5:302023-06-22T12:47:41+5:30

कार्यालयातच स्वीकारली १३ हजारांची लाच

senior clerk trapped taking bribe in Deputy Director of Education Office | शिक्षण उपसंचालक कार्यालयातील बडे बाबू ‘ट्रॅप’, एसीबीची कारवाई

शिक्षण उपसंचालक कार्यालयातील बडे बाबू ‘ट्रॅप’, एसीबीची कारवाई

googlenewsNext

अमरावती : वैद्यकीय प्रतिपूर्तीचे बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात १३ हजार रुपयांची लाच घेताना शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला ट्रॅप करण्यात आले. २१ जून रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय स्थित माध्यमिक विभागातील कक्ष क्रमांक ४ मध्ये त्याने लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. रूपेश प्रतापसिंह ठाकूर (३३) असे लाचखोर बडे बाबूचे नाव आहे.

तक्रारदार हे वाशिम जिल्ह्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या वडिलांवर मुंबई येथे उपचार झाला. त्यांनी वडिलांच्या ३.३७ लाख रुपयांचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे बिल मंजुरीसाठी येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात टाकले. ते मंजूर करण्यासाठी वरिष्ठ लिपिक रूपेश ठाकूर हा १५ हजार रुपये लाच मागत असल्याची तक्रार त्या लिपिकांनी अमरावती एसीबीकडे नोंदविली. तक्रारीची २१ जून रोजी पडताळणी केली. पडताळणीदरम्यान ठाकूरने लाचेची मागणी करून १३ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले व लगेच त्याला त्याच्याच कार्यालयात लाचेची ती रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध शहर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षकद्वय योगेशकुमार दंदे व अमोल कडू यांच्या नेतृत्वात अंमलदार नंदकिशोर गुल्हाने, आशिष जांभोळे, शैलेश कडू, चालक पीएसआय सतीश किटुकले, चंद्रकांत जनबंधू आदींनी कारवाई केली.

Web Title: senior clerk trapped taking bribe in Deputy Director of Education Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.