शिवसेना संपर्क अभियनातून जाणल्या व्यथा

By admin | Published: May 15, 2017 12:17 AM2017-05-15T00:17:08+5:302017-05-15T00:17:08+5:30

विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेने संपर्क अभियान राबविले आहे.

Sense to know from Shiv Sena Contact Engineer | शिवसेना संपर्क अभियनातून जाणल्या व्यथा

शिवसेना संपर्क अभियनातून जाणल्या व्यथा

Next

मुंबई आमदारांची वारी : उद्धव ठाकरेंना आज शेतकरी प्रश्नांचा अहवाल होणार सादर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेने संपर्क अभियान राबविले आहे. त्यानुसार रविवारी मुंबईचे आ. संजय पोतनीस यांच्या नेतृत्वातील चमुने अमरावती, बडनेरा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या भेटी घेवून त्यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसोबत थेट संपर्क साधण्यासाठी शिवसेना संपर्क अभियानाला प्रारंभ केला आहे. या अभियानाचा अकोला येथे सोमवारी १५ मे रोजी समारोप होणार आहे. त्यानुसार विदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी गठित सेना आमदारांकडे विविध विधानसभा मतदार संघांची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
आ. राजू पोतनीस यांनी बडनेरा मतदार संघातील भातकुली, अंजनगाव बारी आदी गावांना भेटी देवून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जपुरवठा, बँकांचे धोरण, थकबाकी, पीक परिस्थिती, गुरांसाठी चारा, मुला-मुलींच्या शिक्षणाची परिस्थिती, कौटुंबिक समस्या आदींवर सेना आमदारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना भर दिला.
शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या धोरणाबाबत काय वाटते, हे सेना आमदार पोतनीस उद्धव ठाकरे यांना अहवाल रुपात सादर करतील. गत दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सेना नेते, आमदारांची चमू विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. सेनेचे नेते गावखेड्यात पोहचून शेतकऱ्यांशी संवाद साधताना सेनेबद्दल त्यांची मानसिकता तपासून पाहत आहेत. दरम्यान आ. पोतनीस यांनी अंजनगाव बारी, भातकुली आदी भागाचा दौरा आटोपून येथील शासकीय विश्रामभवनात स्थानिक निवडक सेना नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिवसेना संपर्क अभियानाची भूमिका मांडली.
यावेळी मुंबईचे नगरसेवक राजू पेडणीकर, अरविंद भोसले यांच्यासह महानगर प्रमुख सुनील खराटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रशांत वानखडे, वर्षा भोयर, मनीषा टेंभरे, वर्षा खारोडे, पराग गुडधे, ललित झंझाड, प्रवीण हरमकर, राजेंद्र तायडे आदी उपस्थित होते. दरम्यान, एक चमु मोर्शी, वरुड तर धामणगाव, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शेतकऱ्यांच्या भेटीसाठी दाखल झाली होती.

Web Title: Sense to know from Shiv Sena Contact Engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.