सुपरस्पेशालिटीमध्ये होणार डेंग्यू चाचणीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:15 AM2021-08-29T04:15:36+5:302021-08-29T04:15:36+5:30
अमरावती : स्थानिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयात डेंग्यू चाचणी प्रयोगशाळा सुरू होण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे ...
अमरावती : स्थानिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयात डेंग्यू चाचणी प्रयोगशाळा सुरू होण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे लवकरच अहवाल मिळून रुग्णांना तातडीने उपचार देणे शक्य होणार आहे. या प्रयोगशाळेसाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पाठपुरावा केला आहे. अमरावती येथे ही डेंग्यू चाचणी प्रयोगशाळा लवकरात लवकर सुरू व्हावी याकरीता पालकमंत्र्यांनी सातत्याने शासन दरबारी ही मागणी रेटून धरली आहे. डेंग्यू या आजाराचे निदान तत्काळ होऊन उपचार मिळणे आवश्यक असते. वेळीच निदान न झाल्यास अनेक रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतो. विभागाचे मुख्यालय असूनही अमरावती जिल्ह्यात डेंग्यू चाचणीची प्रयोगशाळा नाही. अकोल्यातील प्रयोगशाळेतून अहवाल येण्यास अनेक दिवस लागतात. अशा काळात निदान न होणे, प्लेटलेट्स कमी होतात. त्यामुळे रुग्णांच्या जिवाची जोखीम वाढते हे लक्षात घेऊन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी तातडीने या मागणीचा शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला असून लवकरच ही स्वतंत्रपणे प्रयोगशाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. डेंग्यू चाचणीसाठी अमरावती येथे स्वतंत्र प्रयाेगशाळेची गरज लक्षात घेऊन याबाबतचा प्रस्ताव आरोग्य सेवा संचालक यांच्या माध्यमातून आयसीएमआयआरला पाठविला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुणे येथील आरोग्य सहसंचालक कार्यालयातर्फे डेंग्यू तपासणी प्रयोगशाळा उभारण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती आहे.