'ईव्हीएम' व 'व्हीव्हीपॅट' यंत्रणेसाठी आता स्वतंत्र गोदाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:57+5:302021-06-29T04:09:57+5:30

अमरावती : निवडणुकीतील महत्त्वपूर्ण साधने असलेल्या 'ईव्हीएम' व 'व्हीव्हीपॅट" यंत्रणा सुस्थितीत व सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र गोदामाची उभारणी जिल्हा ...

Separate warehouse for EVM and VVPAT system now | 'ईव्हीएम' व 'व्हीव्हीपॅट' यंत्रणेसाठी आता स्वतंत्र गोदाम

'ईव्हीएम' व 'व्हीव्हीपॅट' यंत्रणेसाठी आता स्वतंत्र गोदाम

Next

अमरावती : निवडणुकीतील महत्त्वपूर्ण साधने असलेल्या 'ईव्हीएम' व 'व्हीव्हीपॅट" यंत्रणा सुस्थितीत व सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र गोदामाची उभारणी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून करण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाले.

यावेळी विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे, विधानसभा सदस्य सुलभा खोडके, बळवंत वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, महापौर चेतन गावंडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, जयंत देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार आदी उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाकडून या कामासाठी १४.९९कोटी रुपये निधीच्या नियोजनाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे हे काम होत आहे.

गोदाम इमारतीची तळमजला व पहिला मजला अशी रचना असेल. १,९२६ चौरस मीटर जागेत तळमजल्यावर सहा मतमोजणी कक्ष असतील. मतदान यंत्रणेसाठी सुरक्षा कक्ष असेल. दर्शनी भागात आवक जावक कक्ष, स्वच्छतागृह आदी सुविधा असतील. पहिल्या मजल्यावर कार्यालय असेल. त्याशिवाय, सुरक्षेसाठी मजबूत आवारभिंती, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, अग्निशमन व्यवस्था आदी बाबी असतील. यंत्रणेची सुस्थिती व सुरक्षितता राखण्यासाठी हे गोदाम उपयुक्त ठरणार आहे.

Web Title: Separate warehouse for EVM and VVPAT system now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.