लोकवर्गणीतून साकारला विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:13 AM2021-05-21T04:13:57+5:302021-05-21T04:13:57+5:30
फोटो पी २० पुसला पुसला : लोकवर्गणी व युवकांच्या पुढाकाराने येथील जय भवानी आदिवासी आश्रमशाळेत विलगीकरण कक्ष ...
फोटो पी २० पुसला
पुसला : लोकवर्गणी व युवकांच्या पुढाकाराने येथील जय भवानी आदिवासी आश्रमशाळेत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला. वरूड तालुक्यातील पुसला गावात कोरोनाच्या उद्रेकासह मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. परिणामी, गावात विलगीकरण कक्षाची आवश्यकता होती. त्यामुळे गावातील युवकांनी आश्रमशाळेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी क्षणाचा विलंब न लावता विलगीकरण कक्ष उभारण्याची परवानगी देण्यात आली.
जय भवानी आदिवासी आश्रमशाळेचे अध्यक्ष दिवंगत रत्नाकर अहेर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आश्रमशाळेचे कोषाध्यक्ष रमेश श्रीराव यांच्या हस्ते शाळेतील विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे, तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख, सरपंच धनराज बमनोटे आदी उपस्थित होते. विलगीकरण कक्षात २० खाटांची व्यवस्था असून नास्ता, जेवण, ऑक्सिजन सिलिंडर व वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील गरजू कोरोना रुग्णांनी लाभ घेण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते सुशील डोंगरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.