धामणगावात पॅरिसहून आलेल्या दाम्पत्याचे घरीच विलगीकरण; आरोग्य यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 05:49 PM2020-03-18T17:49:59+5:302020-03-18T17:50:22+5:30

धामणगाव शहरातील मुख्य कॉलनीत समृद्धी कंपनीत नोकरीला असलेले एक कुटुंब भाड्याने राहतात.

Separation of couple from Paris at home Health system alert | धामणगावात पॅरिसहून आलेल्या दाम्पत्याचे घरीच विलगीकरण; आरोग्य यंत्रणा सतर्क

धामणगावात पॅरिसहून आलेल्या दाम्पत्याचे घरीच विलगीकरण; आरोग्य यंत्रणा सतर्क

Next

- मोहन राऊत

अमरावती : अनेक दिवस पॅरिसमध्ये मुक्कामाला असलेले दाम्पत्य धामणगाव शहरात दोन दिवसांपूर्वी परतले. तालुका प्रशासनाने या दाम्पत्याला १४ दिवस घरीच विलगीकरणासाठी ठेवले असून महसूल, आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या घरात असलेली मोलकरीण व घरमालकांचेही विलगीकरण करण्यात आले. दरम्यान बुधवारी भरणारा बाजार रद्द करण्यात आला.

धामणगाव शहरातील मुख्य कॉलनीत समृद्धी कंपनीत नोकरीला असलेले एक कुटुंब भाड्याने राहतात. त्यांचा मुलगा व सून पॅरिसमध्ये वास्तव्याला आहे. हे दाम्पत्य १४ मार्चला हेद्राबाद येथे आले. तेथून धामणगावात राहणाºया वडिलांकडे १५ मार्च रोजी ते पोहचले. तालुका प्रशासनाला बुधवारी माहिती मिळताच त्यांचा शोध घेऊन तहसीलदार भगवान कांबळे व ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक महेश साबळे यांनी त्या दाम्पत्याला घरीच विलगीकरनासाठी ठेवण्यात आले. घरमालक व या घरात काम करणारी महिला मोलकरीण यांचेही विलगीकरण केले आहेत. पुढील १४ दिवस घराबाहेर न पडण्याची ताकिद तसेच लेखी करारनामा लिहून घेऊन जिल्हा प्रशासनानाला पाठविला, तसेच हे दाम्हत्य, घरमालक, भाडेकरू तीन दिवसांत कुणा-कुणाच्या संपर्कात आले, त्यांची माहिती गोळा करण्यात आल्याचे तहसीलदार भगवान कांबळे यांनी सांगितले. पोलीस प्रशासन आरोग्य यंत्रणा या कुटुंबाच्या विलगीकरनावर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान तालुका प्रशासनाने नगरपालिका, पोलीस, आरोग्य यंत्रणेची तातडीची बैठक घेतली तद्नंतर धामणगाव शहरातील सर्व खासगी डॉक्टराची ग्रामीण रुग्णालयात अधीक्षक महेश साबळे यांनी बैठक घेऊन विदेशातून व मागील दोन दिवसांत मुबंई, पुणे येथून आलेल्यांची माहिती घेऊन अशी व्यक्ती खासगी रुग्णालयात उपचारासाठी आल्यात का? कोरोनाची लक्षणे आढळल्यास तालुका प्रशासनाला त्वरित कळविण्याच्या सूचना दिल्या. धामणगाव शहरात बुधवारी भरणारा आठवडी बाजार नगरपालिकेने रद्द केला. रविवार बाजारदेखील भरणार नाही, अशी सूचना मुख्याधिकारी सुमेध अलोने यांनी दुकानदारांना दिल्या. नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि संसर्ग टाळण्याकरिता पुरेशी खबरदारी घ्यावी, गरजेनुसार प्रवास करण्याचे आणि अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन आमदार तथा नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी केले. सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्याचे अडसड म्हणाले.

Web Title: Separation of couple from Paris at home Health system alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.