संत्राउत्पादक शेतकऱ्यांपुढे संकटांची मालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:00 AM2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:00:13+5:30
संत्री काढणीला आला असताना, कोरोना विषाणूमुळे निर्यातबंदी लादण्यात आली आहे. त्यापूर्वी भीषण दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांनी केला. यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा पडून होता. परिणामी तो कवडीमोल भावात गेला. अशातच अवकाळी पावसाने व गारपिटीने झोडपल्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : लगतच्या वरूडसह मोर्शी तालुका विक्रमी संत्राउत्पादनासाठी प्रसिद्ध असल्याने विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो. मात्र, अलीकडे तालुक्यातील संत्राउत्पादक शेतकरी विविध संकटांचा सामना करत आहे. रविवारी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे त्या मालिकेत आणखी भर पडली.
संत्री काढणीला आला असताना, कोरोना विषाणूमुळे निर्यातबंदी लादण्यात आली आहे. त्यापूर्वी भीषण दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांनी केला. यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा पडून होता. परिणामी तो कवडीमोल भावात गेला. अशातच अवकाळी पावसाने व गारपिटीने झोडपल्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आंबिया बहराची संत्री व संत्राबागांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या पावसात दापोरी, डोंगरयावली, घोडदेव, पाळा, सलबर्डी यासह परिसरात अवकाळी पावसासह हलकी गारपीट झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्याचा तडाखा संत्राउत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.