पीडित रूग्णांची अंत:करणातून सेवा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2015 12:11 AM2015-09-08T00:11:54+5:302015-09-08T00:11:54+5:30

गरीब, गरजू आणि पीडित रूग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी शासकीय रूग्णालयात येतात.

Serve the sufferers with their heart | पीडित रूग्णांची अंत:करणातून सेवा करा

पीडित रूग्णांची अंत:करणातून सेवा करा

Next

पालकमंत्री पोटे : युवा चेतना रथाला हिरवी झेंडी
अमरावती : गरीब, गरजू आणि पीडित रूग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी शासकीय रूग्णालयात येतात. केवळ औपचारिकता न ठेवता त्यांची डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी मनापासून सेवा करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
सोमवारी युवा चेतना दिनानिमित्त जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजित एड्स जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी युवाचेतना रथाला हिरवी झेंडी दाखवून रथ रवाना केले. आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे, जिल्हा शल्य चिकित्सक अरूण राऊत, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे सहसंचालक मुकुंद डिग्गीकर आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पुढे म्हणाले, एड्सबाधित रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सहानुभूतीचा असावा, तसेच या रूग्णांची आरोग्यसेवा करताना योग्य काळजी घ्यावी व त्यांना प्रेमाची वागणूक द्यावी. एड्स निर्मूलन हा समाजासाठी महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे व त्यांच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून एड्स रूग्णांसाठी चांगला संदेश द्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. युवा चेतना दिनानिमित्त विद्यार्थिीनींनी पथनाट्य सादर करून एड्सचा रूग्ण व त्यांच्या संततीचा करण्यात येणारा तिरस्कार याबाबतच्या वस्तुस्थितीचे दर्शन घडविले.
याप्रसंगी पालकमंत्र्यांनी सर्व उपस्थिताना एड्स संरक्षण व सुरक्षेसंबंधीची शपथ दिली. या कार्यक्रमाला जिल्हा रूग्णालय, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर्स, कर्मचारी व एड्स नियंत्रण संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांचे आभार अजय साखरे यांनी मानले.

Web Title: Serve the sufferers with their heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.