गोवऱ्यांच्या माध्यमातून ‘श्री गजानना’ची सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:41 PM2018-01-06T23:41:01+5:302018-01-06T23:41:33+5:30

तालुक्यातील सासन (बु.) गावातील गजानन भक्तांनी शेगावला जाणाऱ्या दिंडीचे वेगळेपण निर्माण केले असून या वेगळेपणामुळे या दिंडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

The service of 'Shri Gajanana' through the gaushas | गोवऱ्यांच्या माध्यमातून ‘श्री गजानना’ची सेवा

गोवऱ्यांच्या माध्यमातून ‘श्री गजानना’ची सेवा

Next
ठळक मुद्देअंगारा गोवरी दिंडी : शेगावला अंगारा बनविण्यासाठी गोवरी दान

किरण होले।
आॅनलाईन लोकमत
दर्यापूर : तालुक्यातील सासन (बु.) गावातील गजानन भक्तांनी शेगावला जाणाऱ्या दिंडीचे वेगळेपण निर्माण केले असून या वेगळेपणामुळे या दिंडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गजानन महाराजांच्या चरणी गोवऱ्यांचे दान देण्याची आगळी-वेगळी परंपरा येथे जपली जाते. याच भाविकांच्या गोवऱ्यापासून ‘श्रीं’चा अंगारा तयार केला जातो. ही आगळी वेगळी पालखी रविवारी शेगावकडे प्रस्थान करणार आहे.
या दिंडीची सुरुवात सन २००८ साली जानराव ठवळे व गोकर्णा ठवळे यांच्या स्मृतिप्रीयर्त्य दीनकर ठवळे यांनी केली. या दिंडीत हळूहळू सर्व गावच सहभागी झाले.
‘त्या’ पत्रकाने मिळाली प्रेरणा
साधारणत: दिंडीच्या एक महिना अगोदर गोवऱ्या एकत्र करण्याचे काम येथील नागरिक सुरू करतात. रानगोवºयांना प्राधान्य असल्याने रानमाळातून, शेतातून रानगोवºया गोळा केल्या जातात. या गोवºया प्रत्येकाच्या घरी गोळा करताना त्यांचे पावित्र्य जपले जाते. आदल्या दिवशी गावातून मिरवणूक काढून गोवऱ्या गोळा केल्या जातात. दुसऱ्या दिवशी दिंडीच्या माध्यमातून शेगावला अर्पण केल्या जातात. दहा वर्षांपूर्वी एका लहान चारचाकी गाडीच्या माध्यमातून सुरू झालेला हा उपक्रम आता दरवर्षी दोन ट्रॅक्टर ट्रॉली भरून रानगोवºया हे भाविक शेगावला अर्पण करतात. यंदा या दिंडीत तीनशे भाविक सहभागी होणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली.
दहा वर्षांपूर्वी येथील काही भाविक शेगावला दर्शनासाठी गेले असता मंदिरात एक पत्रक वाचायला मिळाले. त्या पत्रकात ‘आज काल श्रींचा अंगारा बनविण्यासाठी गोवऱ्या कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने भाविकांनी मोजकाच अंगारा घ्यावा ही विनंती’ असा मजकूर होता. यातून प्रेरणा घेऊन गावकऱ्यानी रानगोवऱ्या गोळा करून एका चारचाकी लहान वाहनाने संस्थानच्या मठात पोहोचविल्या. दुसऱ्या वर्षीपासून याला गोवºयांचा उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.
उत्सव आमुच्या गावाचा
यावर्षी ही दिंडी ८ जानेवारीला शेगावला पोहचते आज ही अंगारा गोवरी दिंडी म्हणजे या गावाचा उत्सव बनला आहे. आम्ही ‘श्री’ चरणी फार मोठे दान देऊ शकत नाही. या गोवरीच्या माध्यमातून सेवेची संधी आम्हाला मिळत असल्याची भावना या गावकºयांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. या उत्सवात सर्व धर्म पंथाचे, जातीचे लोक सहभागी असणे हे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.

गावकऱ्यांच्या सहकार्याने गजानन महाराज संस्थानला आम्ही छोटेसे दान देतो. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ही परंपरा आम्ही जपू.
- आशिष ठवळे, ग्रामस्थ

Web Title: The service of 'Shri Gajanana' through the gaushas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.