सातेगावात साकारला श्रमदानातून गावतलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2016 12:46 AM2016-05-07T00:46:36+5:302016-05-07T00:46:36+5:30

२० वर्षांपासून सातेगाव ग्रामपंचायतीच्या ‘ई-क्लास’ जमिनीवर नागरिकांच्या सहकार्याने गावतलाव साकारत असल्याने याचा नागरिकांना लाभ होणार आहे.

Settled in Sategaon | सातेगावात साकारला श्रमदानातून गावतलाव

सातेगावात साकारला श्रमदानातून गावतलाव

Next

ग्रा.पं.चे सहकार्य : गावकऱ्यांची होणार सोय
वनोजा बाग : २० वर्षांपासून सातेगाव ग्रामपंचायतीच्या ‘ई-क्लास’ जमिनीवर नागरिकांच्या सहकार्याने गावतलाव साकारत असल्याने याचा नागरिकांना लाभ होणार आहे.
या गावतलावमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोयीचे होणार असून जनावरांनासुद्धा पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. परिसरातील शेतातील विहिरीतील पाण्याची पातळीसुद्धा वाढविण्यासाठी मदत होईल. त्यामुळे सातेगावातील शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. या तलावासाठी युवा समाजसेवक महेश खारोडे यांनी सतत २० वर्षांपासून शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.
या जमिनीवर अतिक्रमण केले होते. परंतु अतिक्रमणधारकांनीसुद्धा समजूत काढूून फार मोठा अडथळा दूर करून अधिकारी-शासन, असा कागदपत्रांचा प्रवास सातत्याने करून तहसीलदार, एसडीओ, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच पंचायत समिती सदस्य क्षितिज अभ्यंकर, मातकर, ईश्वरकर, बाबरेकर यांचे विशेष सहकार्य घेऊन गावतलाव निर्माण करण्याचे ध्येय पूर्णत्वास आले. भविष्यात गावातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर रुप धारण करू शकतो, हेच ध्येय समोर ठेवून सातेगाव येथे २० वर्षांच्या तलावाच्या निर्मितीचा सुखकर प्रवास यशस्वी झाला आहे.
तलावाच्या संरक्षण सर्वे करताना गावातील राजकीय विरोधी मंडळींनी अतिक्रमणधारकांनी अडथळा आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. अधिकाऱ्यांना सुद्धा तुम्ही संरक्षणातच तलावाचा सर्वे आराखडा करताना अधिकारी कर्मचाऱ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु गावकऱ्यांच्या व अतिक्रमणधारकांच्या सहकार्यामुळे पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
यासाठी महेश खारोडे यांनी पाणी प्रश्नावर गावात जास्तीत जास्त पाणवठ्याची जलशिवाराची कामे आपल्या भागात कशी जास्त केली जातील, यासाठी अण्णा हजारे, पोपटराव पवार नाम फाऊंडेशन यांच्यासोबतसुद्धा पाण्यावर जास्तीत जास्त काम कसे करता येतील, नदी-नाल्यावर बंधारे, शेततळे, पाणी पश्नावर चर्चा लेख लिहून पाण्यासाठी जास्तीत जास्त काम करत असतात. या कामातूनच आपल्या गावात त्यांनी मोठा गावतलाव निर्मितीचा उद्देश साध्य केला आहे. या तलावाच्या कामामुळे सर्व गावकरी, शेतकरी समोरील पाण्याचा संकटापासून भयमुक्त होऊन आनंदी झाले.(वार्ताहर)

Web Title: Settled in Sategaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.