सेतू केंद्र ठप्प, शेतकºयांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 11:48 PM2017-08-31T23:48:33+5:302017-08-31T23:48:48+5:30

कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरत असतांना सर्व्हर डाऊन असल्याने शेतकºयांना दररोज चकरा माराव्या लागत आहे.

 Setu center jam, farmers' strains | सेतू केंद्र ठप्प, शेतकºयांचा ठिय्या

सेतू केंद्र ठप्प, शेतकºयांचा ठिय्या

googlenewsNext
ठळक मुद्देतिवस्यात कॉग्रेस आक्रमक : आॅनलाईन अर्जासाठी शेतकºयांना हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरत असतांना सर्व्हर डाऊन असल्याने शेतकºयांना दररोज चकरा माराव्या लागत आहे. जिल्ह्यात सर्वात कमी अर्ज तिवसा तालुक्यात अपलोड झाले आहे.शेतकºयांना होणाºया त्रासाचे निषेधार्त तिवसा तालुका कॉग्रेस कमेटीच्या पदाधिकाºयांसह शेतकºयांनी गुरूवारी तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.समस्येचे त्वरीत निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा यावेळी निवेदनाव्दारे देण्यात आला. विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाºयांनी तालुक्यातील सेतू केंद्रांना भेटी दिल्यात मात्र सर्व्हर डाऊनची समस्या निकाली निघालेली नाही, शेतकरी मृत असल्यास अर्ज कोणी करावा याचा उल्लेख शासन निर्णयात नाही, आपले सरकार सेवा पोर्टल हे नेहमी बंद पडत, आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे शेतकºयांना अडचणी उद्भवत आहे व तालुक्यात ही सुविधा नसल्याने हे केंद्र पहिले सुरू करण्यात यावे,
१८ हजार शेतकरी प्रतीक्षेतच
अमरावती : तालुक्यातील १८ हजारावर शेतकºयांचे अर्ज भरावयाचे असल्याने १५ सप्टेंचर हा अवधी कमी पडतो, यासह अन्य मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी तालुकाध्यक्ष मुकुंद देशमुख, दिलीप काळबांडे, संजय देशमुख, अभिजित बोके, पूजा आमले, लुकेश केने, मंगेश भगोले, उज्वला पांडव, रंजना पोजगे, वैभव वानखडे, मंगेश राऊत, अनूप अढाऊ, सचिन राऊत, अतुळ गवड, मुकूंद पुनसे, विवेक देशमुख, श्याम कांदे आदी उपस्थित होते

Web Title:  Setu center jam, farmers' strains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.