मेळघाटात डेंग्युुचे सात रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:09 AM2021-07-03T04:09:45+5:302021-07-03T04:09:45+5:30
चिखलदरा : तालुक्यातील आमझरीत डेंग्यूचे सात रुग्ण आढल्याने आदिवासींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वांचे रक्त नमुने प्रयोगशाळेत ...
चिखलदरा : तालुक्यातील आमझरीत डेंग्यूचे सात रुग्ण आढल्याने आदिवासींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वांचे रक्त नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले असून, आरोग्य यंत्रणा घरोघरी जाऊन तपासणी करीत आहे. पावसाळ्याच्या दिवसात साचलेल्या व भरून ठेवलेल्या पाण्यामुळे डेंग्यूस्या डासांची उत्पत्ती झाल्याचे प्राथमिक तपासणीत पुढे आले आहे. मेळघाटात पावसाळ्यापूर्वी नुकतीच आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर हे रुग्ण निघल्याने त्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कुपोषणानंतर, कोरोना व आता डेंग्यूसारखा आजार मेळघाटात पाय पसरवित असल्याने आदिवासींच्या आरोग्याची भीती निर्माण झाली आहे. पूर्वापार अंधश्रद्धेच्या खाईत लोटलेल्या आदिवासींना उपचारार्थ अथक प्रयत्नानंतर रुग्णालयात दाखल करावे लागतात. त्यातही विविध आजार पसरत असल्याचे तपासणीत पुढे आले आहे.
डेंग्यूच्या आजाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १५ दिवसात डेंग्यूचे सात रुग्ण आढळून आले आहेत. यातील काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार झाल्याची माहिती आहे. सलोना प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या आमझरी गावात डेंग्यूसदृश आजाराने सात रुग्ण १५ दिवसात आढळल्यामुळे जिल्हा हिवताप अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी आदींनी भेटी दिल्या.
बॉक्स
७८ पथकांनी केली झोन तपासणी
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी प्रत्येक आदिवासींच्या घरात जाऊन स्तनदा गर्भवती माता शून्य ते सहा वयोगटातील बालके आदींच्या आरोग्याची तपासणी झोननिहाय केली जाते. यंदा १३ ते २० जूनपर्यंत मेळघाटात मोहीम राबविली गेली. दरम्यान स्वच्छता व इतर दुसऱ्या बाबींवर एका गावात सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत तपासणी करायची होती डेंगीसारखे रुग्ण निघत असल्याने आरोग्य यंत्रणेने कुठल्या गोष्टीवर लक्ष दिले, हे मात्र संशोधनाचा विषय ठरला आहे.
कोट
आमझरी गावात सात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. त्यांचे रक्त नमुने जिल्हा हिवताप अधिकारी यांनी प्रयोगशाळेत पाठवले आहे. प्रत्येक घरात तपासणी करण्यात आली असून योग्य काळजी घेतली जात आहे. ठिकठिकाणी वापरासाठी पाणी साठविल्याचे पुढे आले. त्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले
- सतीश प्रधान,
तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा