अमरावती जिल्ह्यात सात लाखांची देशी व विदेशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 04:59 PM2020-09-17T16:59:59+5:302020-09-17T17:01:31+5:30

तळेगाव-देवगाव सुपर हायवे औरंगाबादवरुन चंद्रपूर येथे जाणारा अवैध देशी, विदेशी दारूची वाहतुक करताना चारचाकी वाहनासहित एकास अटक करण्यात आली.

Seven lakh domestic and foreign liquor seized in Amravati district | अमरावती जिल्ह्यात सात लाखांची देशी व विदेशी दारू जप्त

अमरावती जिल्ह्यात सात लाखांची देशी व विदेशी दारू जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर -औरंगाबाद हायवेवरील घटनातळेगाव पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिय पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तळेगाव-देवगाव सुपर हायवे औरंगाबादवरुन चंद्रपूर येथे जाणारा अवैध देशी, विदेशी दारूची वाहतुक करताना चारचाकी वाहनासहित एकास अटक करण्यात आली. येथील ठाणेदार अशोक कांबळे यांच्या मार्गदर्शनात दुय्यम ठाणेदार बिरानजे संजय भोपळे यांना माहिती मिळताच देवगाव येथील हायवे पोलिसांना सूचना देण्यात आली . तसेच हायवे पोलीस अधिकारी पी एस आय खंडारे व पोलीस कर्मी यांनी तळेगाव- देवगाव मार्गावरील रमेश इंगोले यांच्या शेताजवळ नाकाबंदी केली.

दरम्यान सायंकाळी ४वाजताच्या सुमारास एक संशयित भरधाव पिकअप वाहन येत असल्याने वाहनाला हात दाखविला तर वाहन चालकाने डावीकडे शेतातील नाल्यात गाडी पलटी केली. पिकअप वाहन क्र. एम एच ०४/ जे एफ ४६६७ चा चालक गाडीमधून उडी घेऊन पसार झाला व गाडीत असलेला दुसरा व्यक्ती शेख रिजवान शेख करीम (२९ रा. कासम पंजा वरोरा जिल्हा चंद्रपूर) याला अटक करण्यात आली. गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये देशी व विदेशी दारू मिळून आली. मात्र याविषयीचा कोणत्याही प्रकारचा परवाना पत्र आढळून आला नाही. गाडीला सरळ करून तपासा दरम्यान ४८ देशी दारूच्या पेट्या त्या पेटीमध्ये ९० मिलीच्या प्लास्टिक १०० देशी संत्रा दारूच्या ४८०० नग पावट्या किंमत प्रति बॉटल ३०रुपये एकूण १ लाख ४४हजार रुपयेचा माल जप्त केला तसेच एका पेटीत नामांकित कंपनीची विदेशी दारूच्या बॉटल किंमत ७२०० रुपयाचा माल मिळून आला.

पूर्ण मिळून देशी विदेशी दारू सहित पिकअप १लाख ४४हजार रुपये व ७ हजार २०० रुपयाची विदेशी दारू सहित ५ लाख ५० हजार रुपये ऐकून ७ लाख १हजार २०० रुपये सहित एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याचेविरुद्ध भादंविचे कलम २७९,६५(इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत ठाणेदार अशोक कांबळे ऐ पी आय प्रदीप बिरानजे, संजय भोपळे, प्रवीण पाटील, अविनाश राठोड, सोबत महामार्ग पोलीस कर्मी पी एस आय खंडारे, गणेश, इमरान, आशिष यांनी सहभाग घेतला.

 

 

Web Title: Seven lakh domestic and foreign liquor seized in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.